देशदूत वृत्ताची दखल : आरोग्य ठेकेदारावर कार्यवाहीसाठी जामनेर न. पा.ने बोलवली विशेष सभा

देशदूत वृत्ताची दखल : आरोग्य ठेकेदारावर कार्यवाहीसाठी जामनेर न. पा.ने बोलवली विशेष सभा

जामनेर- Jamner प्रतिनिधी-

शहरातील आरोग्याचा प्रश्न (Health issues) अतिशय बिकट झाला असून घंटा गाड्या बंद (Bell trains off) आहेत. गटारी साफ केल्या जात नाही. कचरा उचलला जात नाही. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांनी वारंवार तक्रारी (Complaints) करून देखील ठेकेदार (Contractor) दखल घेत नाही. नगरसेवकही (Corporator) हतबल झाले होते.

याबाबत देशदूतने 7 नोव्हेंबर 2021 च्या अंकात वृत्त प्रकाशित करून आवाज उठविला होता .या वृत्ताची दखल घेत जामनेर नगरपालिकेने (Jamner Municipality) संबंधित ठेकेदाराचा (Contractor's) ठेका (contract) रद्द (canceled) करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष सभा (Special meeting) बोलावली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सौ. साधनाताई महाजन यांनी (Mayor Sou. Sadhanatai Mahajan) देशदूत शी बोलताना दिली. वेळप्रसंगी संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती नगराध्यक्ष सौ . महाजन यांनी दिली.

जामनेर नगरपालिका क्षेत्रातील पुणे येथील स्वामी सर्व्हिसेस या कंपनीने घेतला असून शहरातील ज्या कंपनीचे काम पाहण्यासाठी कंपनीचा एकही जबाबदार व्यक्ती शहरात वास्तव्य करून नाही. शहरातील स्थानिक 6 मुकदम व 100 कर्मचारी यांचे भरवशावर सुमारे 50 हजार नागरिक वस्तीच्या या शहरात आरोग्य विभागाचा गाडा सुरू आहे. बिघाड झालेल्या घंटागाड्या दुरुस्त केल्या जात नाही .

ठेकेदार ठेका घेतल्यापासून कुठल्याही प्रकारचे लक्ष द्यायला तयार नाही वारंवार जनतेच्या तक्रारी देऊनही संबंधित ठेकेदार याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दखल घेत नाही . ठेकेदार हे पुण्यावरून फोनद्वारे या कर्मचाऱ्यांची संपर्क साधून कामकाज चालवित आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून कंपनीच्या संचालकांनी या कामाकडे फिरूनही पाहिले नाही. उंटावरून शेळ्या हाकलण्याचा हा प्रकार असून यामुळे या तीन महिन्यात जामनेर शहरातील आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे.

शहरातील कचरा उचलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बारा घंटागाड्या बंद अवस्थेत आहे .केवळ दोनच घंटागाड्या व ट्रॅक्टर या कामासाठी सुरू असून ही व्यवस्था अतिशय तुटपुंजी असल्याने गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक वारंवार आपल्या भागातील नगरसेवक तसेच नगराध्यक्ष यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करीत आहेत.

या तक्रारींची दखल घेत संबंधित ठेकेदाराला नगरपालिके मार्फत अनेक वेळां नोटीसी देण्यात आल्या .परंतु तरीही संबंधित ठेकेदाराने कुठलीही दखल घेतली नाही. याबाबत संबंधित ठेकेदार विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे .संबंधित ठेकेदाराचा ठेका काढून घेण्यात यावा अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

देशदूत ने याबाबत 7 नोव्हेंबर 2021 रोजी ठळक वृत्त प्रकाशित करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर या वृत्ताची दखल घेत दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी जामनेर नगरपालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली असून नगरपालिकेचे या विशेष सभेत संबंधित ठेकेदारावर काय कार्यवाही केली जाते याकडे आता जनतेचे लक्ष लागून आहे.

नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन.
नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन.
ठेकेदारांचा आरोग्याचा ठेका रद्द करणार..... आरोग्याचा ठेका घेतल्यानंतर ठेकेदाराचे पूर्ण दुर्लक्ष दिसत आहे. ठेकेदार पुण्याचा असल्याकारणाने त्याला शहराच्या विस्ताराची कल्पना नाही .गेल्या तीन महिन्यापासून शहरात सर्वत्र घाण पसरली आहे. लोकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या. मात्र ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता दिनांक 13 नोव्हेंबर च्या विशेष सभेत संबंधित ठेकेदाराचा ठेका काढून घेण्या बाबत निर्णय घेतला जाईल .वेळ प्रसंगी त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येईल.
नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com