उपमुख्यमंत्री ना. अजित पवारांसह चार मंत्री आज जिल्ह्यात

उपमुख्यमंत्री ना. अजित पवारांसह 
चार मंत्री आज जिल्ह्यात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह सोहळा 29 रोजी पाळधी येथे होणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यासह 4 मंत्री रविवारी जिल्हा दौर्‍यावर (District tour) येणार असून ते विवाह सोहळ्याला उपस्थिती देणार आहे. त्यामुळे विभाग प्रमुखांनी मुख्यालय न सोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी दिल्या आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम आणि चोपडा तालुक्यातील सनपुले येथील भगवान भिका पाटील यांची कन्या प्रेरणा यांचा विवाह पाळधी ता. धरणगाव येथील साईबाबा मंदिर परिसरात 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता संपन्न होत आहे. त्यानिमित्त राज्यातील विविध मंत्री जळगावात येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि.28 रोजी दुपारी 2 वाजता जैन हिल्स येथील हेलीपेड येथे उतरतील. तेथून पाळधीला ना.गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या हळदीच्या कार्यक्रमाला रवाना होतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता जैन हिल्स येथून हेलीपेडने पुढील दौर्‍यावर जातील. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 4 वाजता जळगाव विमानतळावर उतरतील. तेथून ते ना.गुलाबराव पाटील यांच्याकडील विवाह सोहळ्याला रवाना होतील. त्यानंतर 5.30 वाजता परत विमानाने मुंबईकडे जातील. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे 5.40 वाजता जळगाव विमानतळावर उतरतील. त्यानंतर 7.30 वाजता पाळधी येथील ना.पाटील यांच्याकडील विवाह कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहे. रात्री 9.30 वाजता विमानतळावरून मुंबईला जातील. तर कृषिमंत्री दादा भुसे हे 4.30 वाजता मालेगाव जि. नाशिक येथून पाळधी येथे येतील. ना. गुलाबराव पाटील यांच्याकडील विवाह कार्यक्रमाला उपस्थिती दिल्यावर रात्री 9.50 वाजता सेवाग्राम एक्स्प्रेसने नागपूरकडे रवाना होतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com