38 वर्षांपासून समतानगरवासीय वंचित

38 वर्षांपासून समतानगरवासीय वंचित

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सन 1984 म्हणजेच तब्बल 38 वर्षांपासून शहरातील समतानगरातील (Samatanagar) रहिवासी हे सातबारा उतारा(Satbara Utara) आणि वीजमीटरपासून (electricity meter) वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सातबारा उतारा आणि वीज मीटरसाठी समता नगरातील रहिवाशांनी आज समतानगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत (Collector's office) पायी मोर्चा (Foot march) काढला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून हा पायी मोर्चा (Foot march) समता नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल (Ripai's Mayor Anil Adakmol) यांनी केले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालजवळ आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. याठिकाणी अनिल अडकमोल यांनी समता नगरातील रहिवाशांना मार्गदर्शन केले. तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

अशा आहेत मागण्या

शहरातील समता नगर हा भाग सन 1984 सालापासून वसलेला आहे. या भागात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सर्वांच्या नावाने जळगावं महानगरपालिकेच्या वसुली विभागाकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करण्यात येते. मात्र वरील रहिवाश्यांच्या नावावर सातबाराचा उतारा (Satbara Utara) शासनाकडून देण्यात आलेला नसून सातबाराच्या उतारा येथील रहिवाश्यांना मिळावा याकरीता गेल्या तीन वर्षापुर्वी असाच मोर्चा काढण्यात आला होता. तरी देखील रहिवाशांना सातबारा उतारा मिळालेला नाही.

तसेच गेल्या दोन महिन्यापासून समता नगरातील वीज डिप्या या जळाल्या असून अद्यापही त्या ठिकाणी नविन डिप्या महावितरणाने बसविलेल्या नाहीत. तसेच तेथील रहिवाश्यांना वीज मिटर सुध्दा महावितरणने दिलेले नाही. विज मिटरकरीता (electricity meter) रहिवाश्यांनी नियमानुसार कागदपत्रांची पुर्तता करून महावितरणकडे सुपूत केलेले आहेत. तरीही महावितरणने कोणतीही दखल अद्यापही घेतली नाही. येथील रहिवाश्यांना कायमस्वरूपी विज मिटर बिल द्यावे. तसेच समता नगर परिसरात गोरगरिब मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरीता महानगरपालिकेने या ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू करावी.

समता या भागात जाण्याकरीता मुख्य रस्ता (road) नसून महानगरपालिकेने मुख्य रस्त्याची निर्मीती करावी अशा मागण्या समतानगरवासियांनी केल्या आहेत.

Related Stories

No stories found.