जिल्हाभरातील सात गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

जिल्हाभरातील सात गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील सात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर बुधवार हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. यात जळगाव शहरातील पिंप्राळा येथील गुन्हेगावर दोन वर्षासाठी तर सावदा व रावेर तालुक्यातील 6 गुन्हेगारांना एका वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे करणारे तसेच समाजात दहशत निर्माण करणार्‍या आरोपींची माहिती संकलित करून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम .राजकुमार यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांनी कर्मचार्‍यांना सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ युनूस शेख, पोहेकॉ पंडित सुनील दामोदरे, पोना रवींद्र पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांच्या पथकाने विविध पोलीस ठाण्यातील आरोपींच्या गुन्ह्याबाबतची माहिती मागून हद्दपारचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी सात जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पारित केले आहे.

यांच्यावर झाली हद्दपारीची कारवाई

रामानंद पोलीस स्टेशन हद्दीतील विशाल भिका कोळी रा.पिंप्राळा याला दोन वर्षासाठी तर सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सय्यद इकबाल उर्फ सय्यद भुर्‍या अलाउद्दीन रा. रविवारपेठ सावदा, शेख रईस उर्फ मास शेख इस्माईल रा. गाशिया नगर, शेख जाबीर शेख खलील रा. ख्वाजानगर, रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील विनोद विठ्ठल सातव रा.रावेर , तुळशीराम सुभाष सावळे रा. कर्जत ता.रावेर व निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुनील श्रावण चव्हाण रा. ऐनपुर ता. रावेर या सहा जणांना प्रत्येकी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com