डेंग्यू नियंत्रणाच्या उपाययोजना कागदावरच

आ. भोळेंसह नगरसेवकांची प्रशासनावर नाराजी
डेंग्यू नियंत्रणाच्या उपाययोजना कागदावरच

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहरात डेंग्यू, चिकन गुणिया, मलेरिया Dengue, chicken pox, malaria या साथ रोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र प्रशासनाकडून नियंत्रणासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. केवळ कागदोपत्री उपाय योजना न दाखवता प्रत्यक्ष फवारणी Spray करण्याची सूचना आमदार राजूमामा भोळेंसह MLA Rajumama Bhole भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांना सूचना केल्या. तसेच महानगरपालिकेच्या corporation कारभाराबाबत नाराजी Dissatisfied व्यक्त केली.

शहरातील विविध समस्यांबाबत मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यात आमदार राजूमामा भोळे, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते भगत बालाणी, डॉ. अश्विन सोनवणे, जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, कैलास सोनवणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, दिपमाला काळे यांच्यासह प्रभाग अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते. डेंग्यू, चिकुण गुणिया, मलेरिया या सारखे साथ रोगाचे आजार वाढत असतांनाही महापालिकेकडून कुठलीही उपायोजना केली जात नाही. त्यामुळे तात्काळ उपाय योजना करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक भागांमध्ये अंधार असल्याने एलईडी लावण्याच्या सूचना अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी केल्या.

गणपती विसर्जन

मार्गाची दुरुस्ती करा

येत्या काही दिवसातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणपती विसर्जन मार्गाची दुरुस्ती करावी. अशा सूचना आमदार भोळे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.

तातडीने फवारणी करा

कोरोना पाठोपाठ आता, साथ रोगानेही थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे शहरात फवारणी, धुरळणी आणि अ‍ॅबेटींग तातडीने करण्याची सूचना देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com