औरंगजेबाचेे उदात्तीकरण करणार्‍यांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करा

चाळीसगावात शिवप्रेमीची निवेदनाव्दारे मागणी
औरंगजेबाचेे उदात्तीकरण करणार्‍यांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

औरंगजेबाला (Aurangzeb) हीरो असल्याचे भासविण्यासाठी व महाराष्ट्रातील (maharastra) बहुसंख्य लोकांच्या धार्मिक भावना दुखविण्याच्या दृष्टहेतूने काही समाजकंटक औरंगजेबाचे पोस्टर झळकावून छत्रपतीच्या महाराष्ट्रातील जातीय व धार्मिक सलोखा बिघडवून, सामाजिक शांतता भंग करण्याचे कटकारस्थान करून दंगली घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे औरंगजेबाचे पोस्टर झळकाविणारे आणि सोशल मिडियावर औरंजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या पोस्ट व कमेंट करून स्टेटस ठेवणार्‍या सर्व व्यक्तींवर राज्य सरकारने राजद्रोहांचे गुन्हे दाखल करण्याची मागणी चाळीसगाव येथे शिवप्रेमींकडून करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार यांच्या मार्फत दि. १९ जुन २०२३ रोजी देण्यात आले आहे.

या निवेदनातम म्हटले आहे की, सोशल मिडियांवर औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या सातत्याने पोस्ट करणार्या सर्व सोशल मीडिया ग्रुपची व अकाऊंटची यादी तयार करून संबंधित समाजकंटकांची सखोल चौकशी करावी. या प्रकरणाची सायबर क्राइम कडून सखोल चौकशी केल्यास औरंगजेब प्रेमी व्यक्तींचे व समाजकंटकांचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दंगली घडवून आणण्याचे बेकायदेशीर मनसुबे व कटकारस्थाने उघड होतील. औरंगजेब हा क्रूर होता, त्याने सख्ख्या भावंडांच्या हत्या केल्या. बापाला डांबून ठेवलं. ज्याने बळजबरीने असंख्य लोकांचे धर्मांतर केले. निरपराध माहिलांवर अत्याचार केले ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांची अत्यंत क्रूर पध्दतीने हत्या केली. तो औरंगजेब कोणाचा आदर्श कसा असु शकतो औरंगजेब देशाचा शत्रू असताना त्याचे उदात्तीकरण करून राज्यात समाजकंटक चुकीचा पायंडा पाडत आहे. ज्या औरंगजेबाने अतिरेकी धार्मिक निष्ठा, स्वकेंद्रित विचारसरणी, धर्मग्रंथावरील फाजील विश्वास, स्वतःच्या समजुतींभोवती फिरवत ठेवलेली धर्मसंस्था यामुळे असंख्य हिंदूसह काही प्रमाणात मुस्लिमांचेही शोषण केले.

तो औरंगजेब कधीच राजा होवू शकत नाही. असे असतांनाही औरंगजेबाच्या महाराष्ट्रात उदात्तीकरण करून जातीय दंगली घडविण्याचे प्रयत्न होत आहेत. यामुळे समाजात दुही निर्माण करून राज्यातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करु पाहणार्‍याचे मनसुबे सफल होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत तपास करून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यावर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार यांच्या मार्फत दि. १९ जुन २०२३ रोजी चाळीसगाव येथील शिवप्रेमी संघटनानी निवेदणाद्वारे केली आहे. या निवेदन देतेवेळी असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com