खान्देशातील लिंबूला सुरत बाजारपेठेत मागणी

गुढे येथे लिंबू खरेदी बंदचा निर्णय
खान्देशातील लिंबूला सुरत बाजारपेठेत मागणी

रविंद्र पाटील

गुढे ता. भडगाव । Gudhe-Bhadgaon

येथील लिंबू फळमाल विक्री यापुढे सुरत बाजारपेठेतच पाठवण्याचा शेतकर्‍यांचा एकत्रित निर्णय नुकताच येथील राममंदिर चौकात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गावातील लिंबू खरेदी बंद करण्याचा व सुरत येथे लिंबू वाहतुक 3 रुपये किलो ऐवजी 2 रुपये किलो करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी लिंबू उत्पादक शेतकरी, गाडी मालक, चालक, गृप शेतकरी गट गाडी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील एकूण क्षेत्रफळांपैकी 70 टक्के क्षेत्र हे लिंबू फळाखाली फळबागायत असल्याने या गावातील जवळजवळ सर्वच शेतकरी लिंबू फळबागायतदार असल्याने गावाचे मुख्य नगदी फळपिक झाले आहे.

गावात मोठ्या प्रमाणात लिंबूचे उत्पादन घेतले जात असल्याने या गावाची लिंबूचे आगार गावबरोबर गुढे नव्हे लिंबू नगरी अशी नवीन गावाची विशेष ओळख बाजारपेठ बरोबर इतर ठिकाणी देखील निर्माण झाली आहे. येथील रसदार मोठ्याआकाराच्या टपोर्‍या औषधी लिंबूफळाला राज्यात परराज्यातील बाजारपेठत देखील मोठी मागणी असल्याने येथून दररोज सहा ट्रॅक लिंबू दररोज सुरत व इतर बाजारपेठेत जातो.

तेथील व्यापारी देखील या मालाची तात्काळ उठाव व.मागणी करत असतात म्हणून येथील लिंबूचा या बाजारपेठत मोठा रूबाब व बोलबालावजन निर्माण झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संकटकाळात संपूर्ण भारतदेश लॉकडाऊन झाल्याने येथील लिंबू सुरत बाजारपेठेत जाणे बंद झाल्याने काही स्थानिक लिंबू उत्पादक शेतकरी व काही छोटे लिंबू खरेदी करणारे व्यापार्‍यांनी येथे लिंबू खरेदी सुरू केली येथे एक नव्हे दोन नव्हे तब्बल पाच ते सहा छोटे मोठे लिंबू खरेदीदार तयार झाले ते फक्त येथे हिरवाच लिंबूमाल 4 ते 10 रुपये प्रमाणे खरेदी करून लागले व तो माल दुसर्‍या व्यापारीला कमिशनने पाठवत आहे.उरलेला शेतकर्‍यांचा पिवळा लिंबूमाल मात्र घेत नसल्याने शेतकरी तो माल सुरत बाजारपेठत पाठवू लागले.

पावसाळ्यात लिंबू उत्पादन अधिक असल्याने व मागणी कमी असल्याने लिंबूला देखील भाव अतिशय कमी प्रमाणात मिळू लागला.पावसाळ्यातील पिवळा लिंबू बांधीत असल्याने तो जास्त काळ न टिकता लवकर खराब होऊ लागल्याने व्यापारी तो माल घेत नसल्याने मोठी अवहेलना अडचण निर्माण झाल्याने लिंबू मातीमोल झाला आणि लिंबू खरेदी बंद झाली सुरत येथील सुप्रसिद्ध लिंबू चे व्यापारी कदीरभाई व हम्मीदभाई यांनी याबाबत शोध घेतला असता गुढे,बहाळ येथील शेतकरी हिरवा चांगला लिंबू माल स्थानिक लोकांना देत असून ते पुढे व्यापार्‍यांना कमिशनने पाठवत असल्याने आपल्याकडे फक्त पिवळा माल देत असल्याने बाजारपेठत परिणाम दिसून आला म्हणून सुरत येथील दोन्ही व्यापाऱ्यांनी यापुढे पिवळा माल खरेदी न करता परत पाठविल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊ लागले म्हणून शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांशी संपर्क केल्याने त्यांनी सांगितले की वर्षभर आम्ही तुमचा हिरवा, पिवळा माल गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रित खरेदी करतो मग आम्हाला पिवळा माल देता व इतरांनाही हिरवा देतात म्हणून आम्ही यापुढे तुमचा पिवळा माल खरेदी करणार नाही, असा पवित्रा घेतला जर तुमचा हिरवा, पिवळा माल स्थानिक लोक खरेदी करत असतील तर आमचे काही म्हणणे नाही तुम्ही खुशाल त्यांना द्या पण येथील स्थानिक व्यापारी फक्त त्यांच्या फायद्यासाठी फक्त हिरवाच माल मागतात मग पिवळा माल कोठे देणार? म्हणून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असल्याने स्थानिक शेतकर्‍यांनी सुरत बाजारपेठेच्या दोन्ही व्यापार्‍यांशी संपर्क केला आम्ही तुम्हाला यापुढे वर्षभर हिरवा पिवळा माल एकत्र देऊ व येथील खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन सुरत बाजारपेठेत यापुढे लिंबू पाठवण्याचा निर्णय घेतला येथील लिंबू खरेदी बंद करण्याबाबत व सुरत येथे लिंबू पाठविण्याबाबत शेतकर्‍यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी काही शेतकरी आपसात चर्चा करत होते की सुरत येथील व्यापारी यांनी यापुढे शेतकर्‍यांची गळचेपी व अवहेलना करु नये अशी भीती व्यक्त केली आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य डॉ.उत्तमराव महाजन सरपंच प्रकाश पाटील सोसायटी चेअरमन सुभाष पाटील उपसरपंच विनोद चौधरी माजी ग्रा.पं. सदस्य भाऊसाहेब पाटील किशोर पाटील, भगवान महाजन जगन्नाथ माळी, नंदू पवार, माधवराव पवार, दतात्रेय चौधरी, कैलास महाजन भैया पाटील, जितेंद्र कुंटे, सुदाम माळी अनिल पवार, भाऊसाहेब कोष्टी, सचिन बोरसे, रवींद्र गढरी राहुल पाटील आदी लिंबू उत्पादक शेतकरी व गाडी मालक चालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com