राज्यात विजेची मागणी वाढली

निर्मिती व मागणीत पावणे सात हजारांची तफावत
राज्यात विजेची मागणी वाढली

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

यावर्षी मार्च महिन्यातच उन्हाने (temperature) आपला कहर दाखवायला सुरवात केल्याने सध्या राज्यात विजेच्या मागणीतही (Demand for electricity) वाढ होत आहे. रविवारी राज्यात 6 हजार 849 मे.वॅ. चा तुटवडा (Scarcity) जाणावला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यासह राज्यात उष्णतेचा पारा (Heat mercury) दिवसेंदिवस वाढत असून मार्च महिन्यातच उन्हाने चाळीशी गाठली आहे. त्यामुळे सर्वत्र शेती पंप, कुलर्स, एसी सह अनेक ठिकाणी विजेचा वापर (Use) वाढल्यामुळे राज्यातून विजेच्या मागणीत वाढली आहे.

राज्यात 27 रोजी 23 हजार 367 मे.वॅ. विजेची मागणी (Demand for electricity) होती. मात्र प्रत्यक्षात मात्र 16 हजार 519 मे. वॅ. विजेची निर्मिती झाली. यामुळे राज्यात 6 हजार 849 मे. वॅ. विजेची तुट निर्माण झाली होती ही तुट भरुन काढण्यासाठी एनटीपीसी (NTPC) कडून 6 हजार 517 मे. वॅ. वीजेचा पुरवठ करण्यात आला होता.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित विजेची मागणी वाढत असते. मात्र या वर्षी मार्च महिन्यातच विजेची मागणी 23 हजारांवर येवून ठेपली आहे. आगामी एप्रिल, मे महिन्यातही मागणीत मोठ्या प्रामणात वाढ होण्याची शक्यता आहे.

या वर्षी मार्च महिन्यातच तापानाचा पारा 40 ते 43 अंशावर पोहोचला आहे. आगामी मे हिट मध्ये त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात तापमानाचा पारा (Heat mercury) काय उच्चांक गाठतो हे औत्सुक्याचे ठरेल. मात्र यामुळे आगामी काळात विजेच्या मागणीत (Demand for electricity) ही वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या भुसावळ सह परिसरात तपागान सरासरी 41 अंशांवर असल्यामुळे अनेक ठिकाणी शितपेय, रसवंती, यासह शेती, उद्योगांमध्येही विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आह. याचाच परिणावम विजेच्या मागणीवर होत आहे.

दीपनगर प्रकल्पामुळे (Deepanagar project) परिसरातील तापमानात वाढ होत असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून होत आहे. त्यात दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पात 660 मे,वॅ. प्रकल्पाची निर्मिती होत आहे. त्यामुळे आगामी काळात तापमानासह विजेच्या मागणीत ही वाढ होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासन व प्रशासन स्तरावर उपाययोजना होण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.