अ‍ॅड. रोहिणीताई खडसे व शिवराज पाटील यांना अटक करण्याची मागणी..

शिवसेनेतर्फे मुक्ताईनगर येथे आंदोलन
अ‍ॅड. रोहिणीताई खडसे व शिवराज पाटील यांना अटक करण्याची मागणी..

मुक्ताईनगर Muktainagar

शिवसेना (Shiv Sena) पदाधिकारी आणि राष्ट्रवादी (Nationalist) पदाधिकारी यांच्यामध्ये आ.चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट (Offensive post) टाकल्याबद्दल वाद निर्माण झाला होता. या वादाचे पर्यवसान दोघा पदाधिकारी विरोधात भा.द.वि.कलम 354 अंतर्गत गुन्हे दाखल (Crime filed) झाले होते.परंतु या प्रकरणात प्रशासनाने शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील आणि ईश्वर हटकर या दोघांना अटक केली होती.परंतु राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवराज पाटील (Shivraj Patil) तसेच रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना अद्याप पर्यंत अटक (Arrested) झालेली नाही. त्याच्याविरोधात शिवसेना युवासेना (Shiv Sena, Yuvasena) आणि महिला आघाडी (Mahila Aghadi) आक्रमक झाले असून दोघांविरोधात समान कलमांतर्गत गुन्हे दाखल असून सुद्धा असा दुजाभाव का केला जात आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे.

शिवराज पाटील यांना अटक करावी तसेच राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांना अटक करण्यात यावी. यासाठी शिवसेना कार्यालय ते पोलीस स्टेशन पर्यंत हजारो शिवसैनिक सामील झाले होते.मोर्चानंतर ठिया आंदोलन सुद्धा करण्यात आले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांना लेखी निवेदन देण्यात आले .

रोहिणीताई खडसे यांनी आमदारांना चोप देऊ ,अशी भाषा वापरल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते रोहिणी खडसे यांना अटक करा , शिवराज पाटील यांना अटक करा , अशा घोषणा देण्यात आल्या.यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे महिला आघाडी तालुकाप्रमुख सरिता कोळी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी पंकज राणे ,आकाश सापधरे, दीपक खुळे, निलेश घुले ,पप्पू मराठे, संतोष मराठे , शकूर जमादार , अफसर खान , जाफर अली सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com