दिल्लीच्या व्यापार्‍याचा फंडा : विनापरवाना ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरून केला कापड विक्रीचा धंदा

रामानंद नगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
दिल्लीच्या व्यापार्‍याचा फंडा : विनापरवाना ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरून केला कापड विक्रीचा धंदा

जळगाव jalgaon

शहरातील रॉयल पॅलेस (Royal Palace) मध्ये ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो (Branded Company Logo) वापरून सेल लावून कपडे विक्री (Selling clothes) करणाऱ्या व्यवसायिकावर (professional) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी (company officials) रामानंदनगर पोलीसांच्या मदतीने छापा (raid) टाकला. यात लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून रामानंदनगर पोलीस (police ) ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथील सभागृहात भाडेतत्वावर दिल्ली येथील कपडे विक्री व्यवसायिकाने (Merchant) सेल लावला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या बॅण्ड असलेले कपडे विक्रीस आणण्यात आले आहे. लिव्हिस या ब्रॅडेड कंपनीच्या लोगो (Branded Company Logo) लावून बनावट शर्ट, जीन्स पॅन्ट आणि सॉक्सची विक्री होत असल्याची माहिती फिल्ड एक्झेक्यूटीव्ह ऑफीसर सचिन गोसावी (Executive Officer Sachin Gosavi) आणि राकेश राम सावंत यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विक्रीला आणलेला मालाची चाचपणी (Testing of goods) केली. यात त्यांना कंपनीचा लोगो लावून कपडे विक्री होत असल्याचे समजल्यानंतर एक्झेक्यूटीव्ह ऑफीसर यांनी रामानंदनगर पोलीसात (police) धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दि. २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाडे, पो.ना. संजय सपकाळे, प्रविण जगदाळे यांनी छापा टाकला. यात शर्ट, जीन्स पॅन्ट आणि सॉक्स बनावट असल्याचे आढळले.

त्यानंतर कारवाई करत लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत (Material seized) करण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Related Stories

No stories found.