बनावट खाते तयार करुन महिलेची बदनामी

सायबर पोलिसात गुन्हा
crime news
crime news

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील एका गावात राहणार्‍या विवाहिता महिलेचे इनस्टाग्राम व फेसबुकवर (Instagram and Facebook) बनावट खाते (Fake accounts) तयार करुन त्या महिलेचे फोटो व्हायरल करुन बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​police station) गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील एका गावात 30 वर्षीय विवाहित महिला वास्तव्यास आहे. विवाहितेचे वेगवेगळया नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवर (Instagram and Facebook) बनावट खाते तयार केले. तसेच महिलेचे फोटोचा वापर करुन खाते तयार केले तसेच फोटो व्हायरल केले.

दि. 16 डिसेंबर 2021 पासून अशाच पध्दतीने अज्ञात व्यक्तीने महिलेचे बनावट खाते (Fake accounts) तयार करुन त्यावरुन फोटो व्हायरल करत तिची बदनामी केली. दि. 6 मे 2022 रोजी प्रकार महिलेच्या लक्षात आल्याने तिने याबाबत जळगाव सायबर पोलिसात (Cyber ​​police station) तक्रार दिली.

या तक्रारीवरुन शनिवारी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com