कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचे पाडसाचा मृत्यू

श्री क्षेत्र मनुदेवी परिसरातील घटना
कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचे पाडसाचा मृत्यू

चिंचोली ता. यावल - Chincholi

सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी परिसरातील मनापुरी नाका जवळ च्या हद्दीत काही कुत्र्यांनी हरणाच्या पाडसाला हल्ला करून जखमी केले . त्याला वाचवण्यासाठी मनापूरी येथील आसाराम बारेला व पिंटू बारेला यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी असलेले पाडसाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचविण्याचा प्रयत्न केला.

त्या जखमी पाडसाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून सदर ग्रामस्थांनी त्याला आपल्या घराजवळील पाणवठ्याजवळ पाणी पाजण्यासाठी आणले असता ते हरिणीचे पिल्लू जबर जखमी झाल्याने गतप्राण झाले. त्या स्थानिक लोकांनी यावल विभागीय आर एफ ओ विशाल कुंठे यांना संपर्क करून पूर्ण माहितीचा आढावा दिला.

त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना संपर्क साधुन तात्काळ घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले . वनपाल वाघझिरा एस आय पिंजारी व वनरक्षक वागझिरा ईश्वर मोरे यांच्या माध्यमातून पंचनामा करून मृत पाडसावर मनुदेवी परीसर क.न.147 वनहद्दीत जंगलातच अंतीमसंस्कार करण्यात आल्याची माहिती वनपाल पिंजारी यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com