दीपनगर ; राखेच्या प्रकल्पाला गावाचा विरोध नाही

विल्हाळे सरपंच सीमा पाटील यांचे स्पष्टीकरण
दीपनगर ; राखेच्या प्रकल्पाला गावाचा विरोध नाही
दीपनगर

वरणगाव फॅक्टरी Varangon Factory | वार्ताहर

विल्हाळे (Velhada) गावी दीपनगरच्या (Deepnagar) राखेचा प्रकल्प (Ash Bund) असल्याने या औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेमुळे गावाला प्रदूषणचा (population) धोका निर्माण झाला आहे, असे पत्र एक व्यक्ती प्रदूषण मंडळाला व विद्युत केंद्राला देत असून हे खोटे असल्याचे स्पष्टीकरण करणारे पत्र विल्हाळे सरपंच सीमा विजय पाटील (Sarpanch Sima Patil) यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

दीपनगर
भेंडवळ घटमांडणीचे भाकीत ; पाऊस पाणी मुबलक, राजा कायम राहणार, रोगराईचे प्रमाण नियंत्रणात!

पत्रकात म्हटले आहे की, औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या राखेमुळे गावातील आठ ते दहा हजार मजुरांना काम मिळाले असून त्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो, तसेच केंद्राने गावासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प लावलेला असून त्याची देखभाल करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे.

प्रदूषण मंडळाने परिसरातील विहिरीचे नमुने घेतले असता पाणी चांगले असल्याचे समजते. तसेच या राखेच प्रकल्पामुळे पाणी आल्याने आजूबाजूच्या परिसरात विहिरींना भरपूर पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतीला व गुराढोरांना पाणी मिळत आहे. सदर प्रकल्पास आमचा कोणताही विरोध नसून बाहेरगावचा व्यक्ती याबद्दल तक्रारी करत आहे, तरी तक्रारीबाबत आम्ही सहमत नाही. निवेदनाच्या प्रती प्रदूषण नियंत्रण मंडळ व औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com