
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Jalgaon District Central Cooperative Bank) संचालक मंडळाची सभा उद्या दि. 22 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्या चेअरमनपदाच्या (Chairmanship) राजीनाम्यावर निर्णय (Decision on resignation)होणार आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गुलाबराव देवकर यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दि. 6 फेब्रुवारी रोजी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला. तसेच शामकांत सोनवणे यांनीही उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे आता चेअरमन आणि व्हाइस चेअरमनपदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा उद्या दि. 22 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत गुलाबराव देवकर आणि शामकांत सोनवणे यांचा राजीनामा मंजूर करावयाचा की नाही? याबाबतचा निर्णय संचालक मंडळ घेणार आहे.
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसही शर्यतीत
जिल्हा बँकेत निवडणूकीवेळी महाविकास आघाडीच्या सुत्रानुसार उपाध्यक्षपद तीन वर्षांसाठी शिवसेनेच्या वाट्याला आले होते. मात्र आता शिवसेनेत फूट पडली असल्याने महाविकास आघाडीपासून शिवसेनेचे काही संचालक दूर गेले आहेत.
त्यामुळे उपाध्यक्षपदावर काँग्रेस पक्ष देखिल दावा करण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेत काँग्रेसचे तीन संचालक आहेत. त्यामुळे संचालक मंडळाच्या या सभेकडे लक्ष लागले आहे.