ग्राहकांनी हप्ता भरण्यासाठी दिलेल्या रकमेवर वसुली अधिकार्‍याचा डल्ला

श्रीराम फायनान्स कंपनील प्रकार ः तालुक्यातील 9 जणांची 4 लाखांत फसवणूक
ग्राहकांनी हप्ता भरण्यासाठी दिलेल्या रकमेवर वसुली अधिकार्‍याचा डल्ला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कर्जाची परतफेड (Loan repayment) करण्यासाठी जळगाव शहरासह तालुक्यातील ग्राहकांनी (customers) हप्त्यापोटी दिलेली रक्कम कंपनीत न भरता श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीच्या (Shriram Transport Finance Company) वसुली अधिकार्‍याने (Recovery Officer) 9 ग्राहकांची 4 लाख 7 हजार 45 हजार रुपयांत फसवणूक (Cheating) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोकुळ बारकू महाजन (रा.मालेगाव, जि.नाशिक ह.मु.कांचन नगर) याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

कंपनीचे व्यवस्थापक चंद्रकांत दत्तू पाटील (वय 40,रा.निमखेडी शिवार, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोकुळ बारकू महाजन हा 23 जुलै 2018 पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीत रिलेशनशीप एक्झीकेटीव्ह या पदावर नोकरीला होता. तीन वर्षात त्याने 141 ग्राहकांकडून नियमित मासिक वसूली केली. 22 जुलै 2021 पासून तो कंपनीत कामावर हजर नाही. याच काळात ग्राहक समाधान सुभाष दळवी (रा.आसोदा, ता.जळगाव) यांनी 40 हजार रुपये रक्कम भरलेली असताना खाते उतार्‍यात त्याचा उल्लेख नसल्याची तक्रार केली. याबाबत व्यवस्थापक पाटील यांनी चौकशी केली असता महाजन याने ही रक्कम वसूल करुन परस्पर खर्च केल्याचे मान्य केले, परंतु ही रक्कम त्यांना परत केल्याचे सांगितले. याच काळात आणखी काही जणांनी अशाच प्रकारे तक्रारी केल्याने चौकशीत 9 जणांचे 4 लाख 7 हजार 45 रुपयांची अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे व्यवस्थापक चंद्रकांत पाटील यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

यांची केली फसवणूक

गोकुळ महाजन याने भगवान धनसिंग पाटील (रा.कानळदा, ता.जळगाव) यांच्याकडून 28 हजार, स्वप्नील विजय साळुंखे (रा.कानळदा, ता.जळगाव) यांच्याकडून 13 हजार 600, मधुकर भास्कर पाटील (रा.उमाळा,ता.जळगाव) यांच्याकडून 12 हजार, रामदास रेलसिंग रावतलीया (रा.अष्टभूजा मंदिराजवळ) यांच्याकडून 1 लाख 81 हजार, तुषार महारु सोनवणे (रा.भोलाणे, ता.जळगाव) यांच्याकडून 7 हजार 454, नाजीम हुसेन शेख (रा.मेहरुण) यांच्याकडून 8 हजार, नरेंद्र अरुण नारखेडे (रा.असोदा, ता.जळगाव) यांच्याकडून 12 हजार, शशिकांत त्र्यंबक कोळी (रा.कानसवाडा, ता.जळगाव) यांच्याकडून 5 हजार व गुणवंत त्र्यंबक सोनार (रा.गुरुदेव कॉलनी) यांच्याकडून 1 लाख 40 हजार रुपये परस्पर वसूल करुन फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरुन बुधवारी रात्री गोकुळ बारकू महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.

Related Stories

No stories found.