कर्जाचा बोजा : शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

 कर्जाचा बोजा : शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

शेंदुर्णी Shendurni ता.जामनेर प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर (Chhatrapati Shivaji Maharaj Nagar)मधील युवक शेतकरी (farmer) ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (वय ४८) यांनी आपल्या शेत नापिकीला (field is barren) कंटाळुन,अल्प उत्पन्न, शेतातील पिकांची दयनीय अवस्था व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला (Debt burden) कंटाळुन शनिवारी आपल्या शेतातच दि.१८ नोव्हेंबर रोजी विष प्राशन (ingesting poison) करून आत्महत्या (committed suicide) केली.

पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र शनिवार दि.१९ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

अडीच एकर कोरडवाहु शेती असलेल्या आपल्या शेतात ते मेहनत करुन आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. त्यांच्या पश्चात वयोवृध्द आई वडील, पत्नी, दोन मुले,एक विवाहित मुलगी असा परिवार असुन त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत असुन त्यांच्या कुटुबीयांना शासकीय मदत त्वरीत मिळावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com