
वरणगाव फॅक्टरी Varangaon Factory वार्ताहर
वरणगाव येथील आरोग्य सेविका (Health care worker) हिस तिच्या नातेवाईक (relatives) असलेले मावस मामा व त्यांच्या परिवाराने जीवे (kill threat) मारण्याची धमकी दिली असून त्याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे .
याबाबत प्रसिद्धीस केलेले निवेदनात म्हटले आहे की , मी वरणगाव येथे डिगंबर मंगल धनगर, यांच्यासोबत रितसर विवाह करून राहत असून काही महीन्यापूर्वी मी माझे मावस मामा रवींद्र देविदास धनगर यांच्याकडे राहत होती ते माझे लग्न सुद्धा होऊ देत नव्हते व माझी त्या वेळेला बदनामी सुद्धा करत होते . माझ्या पगारातील निम्मे पगार सुद्धा तेच हिसकावुन घेत असल्याचे त्यात म्हटले आहे .
त्यानंतर माझे नर्सिग शिक्षण झाले असून मी जामनेर तालुक्यातून आरोग्य सेविका म्हणून नोकरीसाठी त्यावेळेस सुद्धा मला निम्मे पगार त्यांना दिला आहे व त्यांची मुलगी तसेच त्यांचे पत्नी यांनी वेळोवेळी मला पगारासाठी खूप त्रास दिलेला आहे . माझे लग्न झाल्यावर सुद्धा वेळोवेळी ते मला धमकी देत असतात , बऱ्याच वेळा फोनवर सुद्धा त्यांनी धमकी दिली असून माझी बदनामीकारक खोटी माहिती समाजात करीत असतात .
तसेच तुम्हाला दोघांना जिवंत ठेवणार नाही असे फोन करून सांगतात . त्यांचा फोन नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यावर सुद्धा त्यांनी वरणगाव येथे देऊन मला धमकी दिली आहे . याबाबत दोन वेळा वरणगाव पोलीस स्टेशनला तक्रारी दिली असून त्यांच्यावर सौम्य कारवाई होत असून यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे .तरी त्यांच्या कडक कारवाई व्हावी व आम्हाला न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे .