बैल शेतात घातल्याचा राग ; काका-पुतण्याच्या भांडणात पुतण्याचा मृत्यू

बैल शेतात घातल्याचा राग ; काका-पुतण्याच्या भांडणात पुतण्याचा मृत्यू

पाचोरा - प्रतिनिधी pachora

तालुक्याती वाडी शेवाळे येथे पुतण्याचा बैल शेतात घातल्याचा राग येवुन काकाने पुतण्यास तर चुलत काकाने चुलत पुतण्यास काठीने डोक्यात वार केल्याने ४३ वर्षीय पुतण्या हा गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जळगाव (jalgaon) येथे गोदावरी हॉस्पीटलमध्ये (Godavari Hospital) दाखल केल्यानंतर बुधवारी त्याचेवर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाल्याने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस (police) स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी मयताच्या चुलत काकाला ताब्यात घेतले आहे.

वाडी, शेवाळे, ता.पाचोरा येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेत जमिन शेजारी असल्याने पुनमचंद भावराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात घूसल्याचा राग येवुन प्रल्हाद भोसले याने किरण पुनमचंद भोसले यांच्या पाठीत काठीने मारले. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. यामुळे पुनमचंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगांव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.

दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी शेतात बैल घुसल्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याने किरण पुनमचंद भोसले याने चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले व गणेश भोसले यांचे विरुध्द २७ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याने सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपुत यांनी वाडी येथे जावुन गणेश भोसले यास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गणेश भोसले ३० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान किरण भोसले याचे वडिल पुनमचंद भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुनमचंद भोसले यांचा मृत्यू झाल्याने प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करित आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com