लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या वरपित्याचा मृत्यू

कार्यालयात बसलेले असतांना आला हृदयविकाराचा झटका
लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या वरपित्याचा मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दहा दिवसांवर मुलाचे लग्न येवून ठेपल्याने नातेवाईकांसह ऑफिसातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना लग्नपत्रिका (son's marriage) वाटण्यासाठी (distribute marriage cards) गेलेल्या गस सोसायटीतील प्रशासन अधिकारी (Administration Officer) महेंद्र रामा मोरे (वय -57, रा. जीवननगर) यांचा एरंडोल येथे कार्यालयात (office) हृदयविकाराच्या (heart disease) झटक्याने मृत्यू (Death) झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नाच्या घरात शोककळा पसरली आहे.

शहरातील जीवन नगरात ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय 57) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे दि. 1 जून रोजी विवाह सोळहा होणार आहे. विवाह सोहळा दहा दिवसांवर येवून ठेपल्याने महेंद्र मोरे हे मंगळवारी सकाळी पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडले. चोपडा, अमळनेर, धरणगावमार्गे ते एरंडोल येथील ग. स. सोसायटीच्या कार्यालयात पत्रिका वाटण्यास 3 वाजेच्या सुमारास आले होते.

खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जवळच्याच रुग्णालयात कर्मचार्‍यांनी नेले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी जळगाव येथे नेण्यास सांगितले. जळगाव शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषित केले.

कुटुंबियांचे सांत्वन

मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांनी नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला. रुग्णालयात ग. स. सोसायटीतील कर्मचार्‍यांनी मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मोठा मुलगा विक्रांत, लहान मुलगा कुणाल असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com