विहीरीत पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू

विहीरीत पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू

पाचोरा - प्रतिनिधी pachora

तालुक्यातील लोहटार येथील २३ वर्षीय युवकाचा विहीरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस (police) स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहीरीत पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू
बैल शेतात घातल्याचा राग ; काका-पुतण्याच्या भांडणात पुतण्याचा मृत्यू

लोहटार ता. पाचोरा येथील जयकिरण संतोष पाटील (वय – २३) हा युवक २९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी भरण्यासाठी गेला होता. दरम्यान जयकिरण हा लघुशंकेसाठी नाचणखेडा शेत शिवारातील विहीरी जवळुन जात असतांना अंधरामुळे अंदाज न आल्याने अचानक जयकिरण याचा पाय घसरून तो विहीरीत पडला.

घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांच्या मदतीने जयकिरण यास विहीरीतुन बाहेर काढुन तात्काळ पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी जयकिरण यास मृत घोषित केले.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जयकिरण पाटील याचे पश्चात्य आई, वडिल, एक भाऊ असा परिवार असुन जयकिरण हा अविवाहित होता.

विहीरीत पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू
बैल शेतात घातल्याचा राग ; काका-पुतण्याच्या भांडणात पुतण्याचा मृत्यू

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com