खेडगावच्या जवानाला आसाम येथे वीरमरण

खेडगावच्या जवानाला आसाम येथे वीरमरण

भडगाव - Bhadgaon - प्रतिनिधी :

खेडगाव (ता.भडगाव) येथील इंडो तिबेटीयन सेनेत कार्यरत असलेल्या जवानाचा सेवा बजावतांना मृत्यु झाल्याची घटना घडली. ते सध्या आसाम येथे सेवेत कार्यरत होते. उद्या सध्याकांळपर्यंत त्यांचे पार्थिव खेडगाव येथे येण्याची शक्यता आहे.

याबाबत जवानाच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहीती अशी की खेडगाव खु (ता.भडगाव) येथील रहीवासी सुनील यशवंत हीरे (वय 40) हे भारतीय इंडो तिबेटीयन बटालियन 25 अर्थात आयटीबीपी सेनेत कार्यरत होते. त्यांनी पश्चिम बंगाल येथील निवडणूकीत सेवा बजावल्यानंतर ते आसाम येथील डीब्रगड येथे सध्या कार्यरत होते. आज त्याचा मृत्यु झाल्याचे घटना घडली.

याबाबत तालुका प्रशसनाकडे अधिकृतरित्या काही माहीती उपलब्ध नाही. त्यांचा मृत्यु कसा झाला हे ही समजु शकले नाही. आसामहून त्यांचे पार्थिव उद्या सायंकाळपर्यंत खेडगाव येथे येण्याची शक्यता आहे.

मात्र यास अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकला नाही. जवान सुनील हीरे हे 22 वर्षापासून देशसेवेत कार्यरत होते. पुढच्या आठ महीन्यात ते सेवेतुन निवृत्त होणार होते.

मात्र त्यांचा मृत्यु झाल्याने खेडगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यां पश्चात पत्नी, आई, वडील एक 12 वर्षाचा तर दुसरा 8 वर्षाचा मुलगा असल्याचे त्यांचे चुलत बंधु संजय हीरे यांनी सांगीतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com