बांभोरी येथे शेतकऱ्याचा मृत्यू

उष्माघाताची शक्यता : परिसरात हळहळ
बांभोरी येथे शेतकऱ्याचा मृत्यू

धरणगाव Dharangaon प्रतिनिधी

तालुक्यातील टोळी-बांभोरी येथे गुरुवारी दुपारी शेतात काम (While working in the field) करतांना एका शेतकऱ्याचा (farmer) अचानक मृत्यू (sudden death) झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    दिपक किसन पाटील (रा. बांभोरी ता. धरणगाव), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दीपक पाटील हे गुरुवारी सकाळपासूनच भर उन्हात शेतात काम करत होते. दुपारी ते शेतातच अचानक जागेवर कोसळले. त्यांना रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, उष्माघात सदृश्य लक्षणाने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतू अहवाल आल्यानंतरचे मृत्यूचे नेमकं कारण समजू शकणार आहे.

          या संदर्भात धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दीपक पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com