
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम (Kubereshwar Dham) येथे सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक सिहोरमध्ये पोहोचले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीची घटना गुरूवारी घडली. या महोत्सवादरम्यान जळगावच्या एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचा (child) मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. या महोत्सवादरम्यान दोन दिवसांत दोन महिलांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेश्वर धाम रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह गेले होते. महोत्सवाच्या ठिकाणी चालतांना विवेक भट्ट यांचा 3 वर्षांचा मुलगा अमोघ भटची तब्येत बिघडली, चालताना तो अधिकच आजारी पडले, त्याला जवळच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी अमोघला मृत घोषित केले.
आमोघचा दफन विधी सीहोरमध्ये
अमोघ भट या बालकाचा दफनविधी सीहोरमध्येच करण्यात आला. असल्याचे मृत बालकाचे वडील विवेक भट यांनी माध्यमांना माहिती दिली.