मेहरूण तलावात वृध्द महिलेचा आढळला मृतदेह

मेहरूण तलावात वृध्द महिलेचा आढळला मृतदेह

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शहरातील मेहरूण तलावातील (Merun Lake) गणेश घाटजवळील (Ganesh Ghat) पाण्यात आदर्श नगरातील (Adarsh Nagar) 68 वर्षीय महिलेचा (woman's) मृतदेह (dead body) गुरूवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आढळून (detected) आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अकस्मात मृत्यूची (sudden death) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान,त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

सुमती रमेश श्रीखंडे (वय 68) रा. आदर्श नगर, जळगाव असे मृत महिलेचे नाव असून त्या आपल्या कुटुंबियांसह आदर्शनगरात वास्तव्याला आहेत. दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव गणेश घाटजवळ त्यांचा मयत स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली किंवा पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com