
धरणगाव । Dhrangaon
तालुक्यातील रोटवद गावाजवळ दुचाकीच्या अपघातात एकाच परिवारातील दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना रात्री घडली आहे. जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ( Dharangaon Rural Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी (रा.नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे) हे आपल्या आई आणि दोन मुलांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे भेटण्यासाठी दुचाकीने आले होते. भेट झाल्यानंतर दुचाकीने परत जात असतांना धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना प्रभाकर सूर्यवंशी यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांनी पुढे जात असलेल्या बैलगाडीला (bullock cart) जोरदार धडक दिली.
या धडकेत प्रभाकर सूर्यवंशी आणि त्यांची सात वर्षाची मुलगी नायरा याचा मृत्यू झाला तर आई ममता रघुनाथ सूर्यवंशी आणि मुलगा मोहित प्रभाकर सूर्यंवशी (वय-9) हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, स.पो.नि. जितेंद्र पाटील, पो.ना.दीपक पाटील, विनोद संदानशिव, विजय धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली.