
भातखंडे Bhatkhand ता,भडगाव (वार्ताहर)
येथील रहिवासी सैन्य दलातील जवान (Soldiers in the army) दत्तात्रय विठ्ठल पाटील वय ४० यांच्या पार्थीवावर नुकतेच शासकीय इतमामात अत्यंसंस्कार (cremated) करण्यात आले. गोरखपूर जवळ हृदय विकाराचा तीव्र झटका (Heart disease) येऊन ते शहीद झाले
शहिद दत्तात्रय यांचे बिकानेर येथून युनिट आगरतळा या ठिकाणी पोस्टिंगला जात असतांना. रेल्वे मधून प्रवास करत होते. अचानक गोरखपूर जवळ हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन ते शहीद झाले. सैन्य दलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील हे मार्च २००३ मध्ये नाशिक या ठिकाणी भरती झाले होते. ते ३०५ फिल्ड रेजिमेंट मध्ये देशसेवा गेल्या २० वर्षापासून बजावत होते. त्यांचे ट्रेनिंग हैदराबाद व बंगलोर या ठिकाणी झालेले होते. त्यांनी सिक्कीम, जम्मू, बिकानेर, लेह, लडाख या ठिकाणी सेवा बजावली आहे.
जवान दत्तात्रय यांना मंगळवारी दि ४ रोजी वीरगती प्राप्त झाली. भातखंडे ता भडगाव येथे विर जवान दत्तात्रय पाटील अमर रहे च्या जयघोषात '३०५ फिड रेजिमेंट जवान दत्तात्रय पाटील यांच्या पार्थीववार शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयातील वेल्फेअर अॉफीसर अनुरथ वाकडे, रतिलाल महाजन भीमराव पाटील, जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस हेड कॉटर पथक प्रमुख, पोलीस प्रशिक्षक विजय शिंदे ,माजी सैनिक अध्यक्ष बाळू पाटील पाचोरा माजी सैनिक अध्यक्ष दिपक पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पाचोरा प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाडे नायब तहसीलदार रमेश देवकर, गटविकास अधिकारी रमेश वाघ, पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर, राजकीय क्षेत्रातील कर्मवीर तात्यासाहेब किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, भातखंडे चे प्रथम नागरिक भागाबाई भिल, पारोळा मार्केट कमिटी चेअरमन अमोल चिमणराव पाटील, भडगाव माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील, दिनकर पाटील, देविदास पाटील, माधवराव पाटील संजय पाटील, भातखंडे येथील विविध संस्था पदाधिकारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात शोकाकुल वातावरणात
संपूर्ण गावात रांगोळी काढून त्या नंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून शोकाकुल वातावरणात शहिद अत्यंयात्रा काढण्यात आली. गावातील माध्यमिक शाळेच्या स्काॅऊट गाइड विद्यार्थी तसेच माध्यमिक विद्यालय भातखंडे शाळेच्या वतीने संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आला होता.
चिमुरड्यांनी दिली अखेरची सलामी
शहिद जवान दत्तात्रय पाटील पोलीसांनी मानवंदना दिल्यानंतर सलामी देण्यात आली. मुलगा चिन्मय आणि विणू यां दोघ मुलींनी दिला अग्नीडाग दिला यावेळी आई प्रमीलाबाई, वडील विठ्ठल पाटील पत्नी ज्योतीबाई यांचा हुंकार ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
पत्नीच्या स्वाधीन केला तिरंगा
शहीद जवान दत्तात्रय पाटील यांच्या पत्नीकडे अधिकार्यांनी व जवान यांनी वर्दी व तिरंगा दिला या वेळी उपस्थीतांनी भारत माताकी जय ,शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देवून परिसर दणादूण सोडला होता.
शहीद जवान हा अत्यंत शांत व संयमी सोज्वळ स्वभावाचा व मनमिळाऊ होता त्याच्या या स्वभावामुळे तो संपूर्ण गावाचा लाडका होता.