
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या आयुक्तपदी (Municipal Commissioner') कोण असणार ? याबाबतचा निर्णय 5 जानेवारी रोजी औरंगाबाद येथील मॅट (महाराष्ट्र डमिनीस्टेटीव्ह ट्रिब्युनल) कोर्टात होणार होता. याकडे अधिकार्यांसह, नगरसेवक व जळगावकर नागरिकांचेही लक्ष लागले लागले होते. मात्र आता ही सुनावणी (hearing) 9 रोजी होणार आहे.
डिसेंबर 2022 मध्ये मनपाच्या आयुक्तपदावर असलेल्या डॉ.विद्या गायकवाड यांच्या जागी परभणी महानगरपालिकेतून आलेले देविदास पवार यांना आयुक्त पदाची सूत्र देण्यात आले होते. त्यांनीही जळगाव महानगरपालिकेची तात्काळ सूत्रे हाती घेतली होती.
पण कार्यकाळ पूर्ण झाला नाही आणि कोणतेही सबळ कारण न देता अचानक बदली झाली कशी ? म्हणून या बदली विरोधात डॉ.विद्या गायकवाड यांनी मॅट कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आत्तापर्यंत दोनदा सुनावणी झाली. तर तिसरी सुनावणी 5 जानेवारीला होती. मात्र ही सुनावणी आता 9 जानेवारीला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.