सुनसगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत दांगडो

कोरम पूर्ण नसल्याने सदस्थांचा सभात्याग : दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप
सुनसगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत दांगडो

सुनसगाव, (Sunasgaon) ता, भुसावळ वार्ताहर

येथील ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) मासिक सभा २९ रोजी आयोजित केली होती. मात्र सभेसाठी केवळ चार सदस्या उपस्थित असल्याने सभेचा कोरम पूर्ण न झाल्यान सभा तहकुब करण्याची मागणी तीन सदस्यांनी करुन याबाबत (Proceedings Book) प्रोसिडींग बुकात नोंद करुन नक्कल मिळण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर उशीराने सदस्य सभागृहत दाखल झाले. यामुळे दोन्ही गटात गोंधळ झाला. त्यानंतर सभा सुर असतांना तीघे सदस्य सभेतून निघुन गेले.

सुनसगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत दांगडो
वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते बनले मृत्यूचा सापळा!

मिळालेल्या माहितीनुसार, येथील ग्रा.पं. ची. मासिक सभाग २९ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरवातीला चार सदस्य हजर होते काही सदस्य उशिरा आले मात्र सभेला कोरम पुर्ण झाला नाही म्हणून सभा तहकूब करण्यात यावी असे तीन सदस्यांनी सांगितले व सभा तहकूब झाल्याची प्रोसिडींगची नक्कल मिळावी अशी मागणी सदस्य एस. आर. पाटील व सुनिल कंकरे यांनी केली तर महिला सदस्य ज्योती पाटील यांनी सभेतून काढता पाय घेतला. यामुळे नंतर काही सदस्य उशिरा आले तर दोन सदस्य गैरहजर होते.

विशेष म्हणजे ज्या तीन सदस्यांनी सभा तहकूब करण्यात यावी अशी मागणी केली त्यांच्या स्वाक्षरी प्रोसिडींगवर आहेत. त्यामुळे सदर सदस्य सभा सुरू असताना निघून गेल्याचे सरपंच दिपक सावकारे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक मासिक सभेत काहीना काही निमित्त काढून काही सदस्य सभा तहकूब करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे विकास कामांना खीळ बसते आणि कामे होत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात असे सत्ताधारी सदस्यांचे म्हणणे आहे तर वार्डातील कामे होत नाहीत सरपंच व ग्रामसेवक सदस्यांना विश्वासात घेत नाही असे सदस्य एस आर पाटील यांनी सांगितले.
वार्ड क्र. तीन मधील गोंभी गावाकडे लक्ष दिले जात नसून गोंभी गावाचा विकास खुंटला आहे त्यामुळे वार्डाचे ग्रा.पं. सदस्य शामराव मालचे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे सुरवाती पासूनच या ग्रामपंचायत संचालक मंडळाला ग्रहण लागले आहे. ज्यावेळी उपसरपंच पदासाठी निवडणूक होती त्यावेळी एका बाजूला पाच आणि एका बाजूला चार अशी सदस्य संख्या होती.

मात्र त्यावेळी एका सदस्याने मताचा घोळ केल्याने चार - चार अशी समान मते मिळाली होती आणि शेवटी लोकनियुक्त सरपंच यांच्या मताचा हक्क बजावला होता तेव्हा उपसरपंच पदासाठी जागृती पाटील यांची निवड झाली होती आणि तेव्हापासून सत्ताधारी व विरोधक यांच्यात बर्‍याचदा कलगीतुरा रंगला होता. आता मोजून १० महिने या कार्यकारणीकडे असतांना गाव विकासासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे मात्र या - ना त्या कारणाने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत दांगडो होत असल्याने सभा सुरू असताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या खाली बसलेल्या ग्रामस्थांचे मनोरंजन होत असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.