सावखेडा , गौरखेडा, कुंभारखेडा, परिसरात वादळामुळे केळी खोडांचे नुकसान

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, पंधरा ते वीस मिनिटातच होत्याचे नव्हते झाले,घरांचेही अतोनात नुकसान
सावखेडा , गौरखेडा, कुंभारखेडा, परिसरात वादळामुळे केळी खोडांचे नुकसान
केळी पिकाचे झालेले नुकसानफोटो -(संतोष नवले ,सावखेडा)

सावखेडा Savkheda ता रावेर-

सावखेडा, गौरखेडा , कुंभारखेडा परिसरात दिनांक ३१ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह (Stormy winds) हलक्या पावसाला (rain) सुरुवात होऊन बऱ्याच शेतकऱ्यांच्या (farmers) केळी खोडांचे (Major damage to banana peels) मोठे नुकसान झाले आहे. गौरखेडा येथे बऱ्याच ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले. यात गौरखेडा येथील मोठी मोठी वृक्ष (Tree) उन्मळून पडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यात केळीला आता बऱ्यापैकी भाव असताना शेतकऱ्यांची केळी अशी भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी राजा संकटात (crisis) सापडला आहे.

गौरखेडा ता रावेर येथील वादळी पावसामुळे एका ग्रामस्थाच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून घरातील सर्व सामान व जीवनावश्यक वस्तूचे झालेले नुकसान.  फोटो -(संतोष नवले ,सावखेडा)
गौरखेडा ता रावेर येथील वादळी पावसामुळे एका ग्रामस्थाच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून घरातील सर्व सामान व जीवनावश्यक वस्तूचे झालेले नुकसान. फोटो -(संतोष नवले ,सावखेडा)

ात सावखेडा परिसरातील सावखेडा -कुंभारखेडा परिसरात असलेल्या अमोल प्रकाश नहाले यांनी ४५०० केळीची खोडे (Banana peel) लावलेली होती. त्यापैकी ३००० ते ३५०० खोडे वादळामुळे जमीनदोस्त झाली. त्यामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे.

तसेच सावखेडा, गौरखेडा ,कुंभारखेडा, परिसरातील इतर शेतकऱ्यांचेही खूप नुकसान (Damage) झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. गौरखेडा, सावखेडा, कुंभारखेडा परिसरामध्ये जुनी जुनी मोठी मोठी वृक्ष उन्मळून पडुन रस्ते बंद झाले होते.

तसेच गौरखेडा गावामध्ये घरावरील पत्रे उडून, वादळामुळे भिंतींचे नुकसान होऊन ,मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने असंख्य ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरातील सर्व सामान वादळी पावसामुळे ओले होऊन नुकसान झाले. त्यात पंखे, टीव्ही, फ्रीज, कूलर, जीवनोपयोगी सामान यांचे पण खूप नुकसान झाले आहे.

गौरखेडा येथे संपूर्ण गावामध्ये ठिकठिकाणी विजेचे खांब व तार तुटल्याने (broken power poles and wires) गावामधील व परिसरामधील संपूर्ण लाईट रात्रभर बंद होती. वादळी वारे एवढे जोरात होते की, विजेचा खांबही अर्धा तुटून दूरवर फेकला गेला. तसेच गौरखेडा येथील ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून दूरवर शेतामध्ये फेकली गेली. परिसरातील जुनी मोठे मोठे वृक्ष उन्मळून (Uprooted tree) पडल्याने परिसरातील रस्ते बंद झाले होते. तसेच गौरखेडा येथील ३५ जणांच्या घरावरील पत्रे उडून, वादळी वाऱ्यामुळे भिंती पडून घरातील सामानाचे व जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान होऊन लाखोंचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. गौरखेडा येथील एक भला मोठा वृक्ष पडून त्याखाली बऱ्याच बकऱ्या दाबल्या गेल्या व त्यात एक बकरी मृत्युमुखी पडली. व बाकी बकऱ्या जखमी झाल्या.

महसूल विभागाकडून (Department of Revenue) मंडळ अधिकारी जे डी बंगाळे, तलाठी निलेश चौधरी, कोतवाल राहुल बोरनारे यांनी तात्काळ गौरखेडा परिसरामध्ये प्राथमिक पाहणी करून नुकसान झालेल्यांची नोंद केली. गौरखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य गफुर तडवी, ग्रामपंचायत सदस्य व समाजसेवक महेंद्र पाटील यांनी या कामी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com