गॅस गळतीमुळे सिलेडरचा स्फोट

सुदैवाने जिवीत हानी नाही, आगीत एक लाखांचे नूकसान
गॅस गळतीमुळे सिलेडरचा स्फोट

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

तालुक्यातील सांगवी येथे एका ऊसतोड मजुराच्या (sugarcane workers) घरात (house) गॅस गळतीमुळे (Gas leak) अचानक गॅस सिलेडर स्फोट झाला. यात घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व संसारउपयोगी साहित्य जळून खाक (Burn the material) झाले असून जवळपास १ लाख रुपयांचे आर्थिक नूकसान झाले आहे. हि घटना बुधवार दि,११ रोजी संकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली, सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली. परंतू सिलेडरच्या स्फोटामुळे (Explosion of the cylinder) परिसरात मोठा अवाज झाल्याने एकच घबराड निर्माण झाली होती.

सांगवी येथील दामु फंदु राठोड हा ऊसतोड मजूर तीन भावाचे एकत्र कुंटुबात राहतो. त्याची पत्नी बुधवारी संकाळी ९ वाजेच्या सुमारास स्वंयपाक करण्यासाठी गॅस पेटवण्यासाठ गेली असता, गॅस सिलेडरने(gas cylinder) अचानक पेट घेतला, सिलेडर पेटल्याचे पाहताच महिला घराबाहेर पडली. क्षणातच सिलेडरचा स्फोट (Explosion of the cylinder) होवून, ते घराचे पत्रे फाडुन उंच गेले आणि पुन्हा खाली आपडले. अचानक लागलेल्या या आगेत घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात तब्बत एक ते दिड लाख रुपयांचेे नूकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेजारी असलेल्या धनंजय ठाकरे यांच्याही घराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीबाबत महसूल प्रशासनाकडून (Revenue Administration) पंचनामा (Punchnama) करण्यात आले आहे. या प्रकरणाची सायंकळपर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.

तालुक्यातील सांगवी येथे गॅस गळतीमुळे सिलेडरचा स्फोट झाला. परंतू यात कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. जळीत घराचा पंचनामा करण्यात आला असून साधरणात; एक लाख रुपयांचे आर्थिक नूकसान झाले आहे.

जितेंद्र धनराळे, न्यायब तहसीलदार,चाळीसगाव

Related Stories

No stories found.