चाळीसगाव पोस्टात एकाच खिडकीत होणार्‍या गर्दी मुळे ग्राहक त्रस्त

चाळीसगाव पोस्टात एकाच खिडकीत होणार्‍या गर्दी मुळे ग्राहक त्रस्त

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

चाळीसगाव येथील पोस्ट ऑफीसात (Post Office) एकाच खिडकीत (one window) पैसे जमा करण्यासाठी होणार्‍या गर्दीमुळे (crowd) ग्राहक (Customers) त्रस्त झाले आहेत. तासोंतास उभे राहवे लागत असल्यामुळे वृध्दांचे व महिलांचे हाल होत आहे. तसेच दैनदिन भरणा करण्यासाठी आरडीच्या एजेंट लोकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित आरडीचे एजेंट व सुकन्या योजनेचे (Sukanya Yojana) पैसे जमा करण्यासाठी वेगवेगळी खिडकी (Different window) उघडण्यात यावी, अशी मागणी (Demand) ग्राहकांकडून होत आहे.

केंद्र सरकार (Central Government) एकीकडे पोस्ट ऑफीसमध्ये ग्राहकांची संख्या वाढविण्यांवर भर देत आहे. त्यासाठी आरडी, (RD) सुकन्या योजना (Sukanya Yojana) व इतर योजनांच्या सुविधा पोस्टामार्फत (Post) सुरु करण्यात आल्या असून पोस्ट खात्याचेे बॅकेत रुपातंर होत आहे. चाळीसगाव पोस्ट हे जिल्ह्यातील सर्वात मोठे पोस्ट ऑफीस असल्यामुळे येथे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेधारकांना संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. परंतू येथील पोस्ट ऑफीसच्या नियोजन शून्य (Planning zero) कारभारामुळेे (administration) ग्राहकांना मानसिक (Mental) व शारीरीक त्रास (physical distress) सहन करावा लागत असल्याची ओरड ग्राहकांमधून आहे.

आरडी, सुकन्या योजना व इतर योजनाबाबत (बचत खाते वगळता) पैसे जमा करण्यासाठी ग्राहकाना एकच खिडकीची (one window) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ग्राहकांना तासतास उभे राहवे लागते. त्यात आरडीचे एजेंट एकाच वेळी चार, पाच खाते धारकांचे पुस्तके घेवून येतात. त्यामुळे इतर ग्राहकाना ताटकळत उभे राहवे लागते. तर सुकन्या योजनेचे पैस जमा करण्यासाठी येणार्‍या महिला व पुरुषांना देखील यांचा मोठ्या प्रमाणत त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरडीचे पैसे जमा करण्यासाठी एजेंट लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था (Independent arrangement) करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सुकन्या योजनेच्या ग्राहकांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी (Demand) ग्राहकांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com