कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब- देवकर

गुंजन सावंत यांच्या स्केच ड्रॉईंग प्रदर्शनाचे उद्घाटन
कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब- देवकर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सध्याची मुले (Children) अगदी लहान वयापासून मोबाईलशी (mobile) खेळताना दिसतात.सोशल मीडियावर ऑनलाईन असतात. पण यामुळे त्यांच्या अंगभूत गुणांकडे कमालीचे दुर्लक्ष होते. त्याच्या अगदी उलट गुंजन सावंत (Gunjan Sawant) यांनी अत्यंत कमी वयात स्केच ड्रॉईंग (drawing a sketch drawing) रेखाटून त्याचे प्रदर्शन भरविले, ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर (Former Guardian Minister Gulabrao Deokar) यांनी चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

यावेळी प्रमुख पाहुणे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, रा.प.महामंडळ व्यवस्थापिका नीलिमा बागुल, संदीप पोतदार, गुंजनचे मार्गदर्शक तरुण भाटे आदींची उपस्थिती होती. शहरातील बहिणाबाई उद्यान जवळील पु. ना. गाडगीळ अँड सन्स येथे हे प्रदर्शन आजपासून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

3 ते 15 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी सातपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी गुंजन प्रसाद सावंत यांच्यासह भूविकास बँकेचे निवृत्त कर्मचारी व गुंजनचे आजोबा भीमराव सावंत, बाळासाहेब पाटील (आमोदे), चंदू पाटील, धीरज पाटील, कुंदन सावंत, डॉ. नितीन वसंतराव पाटील, गुंजनचे वडील प्रसाद सावंत अनिल पाटील, डॉ.समनपुरे उपस्थित होते.

कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब- देवकर
पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवांशासाठी ही बातमी आहे महत्त्वाची : अनेक रेल्वेगाडया रद्द
कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब- देवकर
बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..

अशोक जैन यांनी खरेदी केली चित्रे

दरम्यान जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी गुजन हीचे कौतुक करत प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीची काही चित्रे विकत घेतली आहेत. कमी वयात गुंजन हीने पेन्सील आणि चारकोलच्या माध्यमातून ही रेखाचित्रे रेखाटली आहेत. चित्रांतील डोळ्यांमध्ये तीने जीवंतपणा आणला आहे.

कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब- देवकर
सावदा येथे तिहेरी अपघातात बालक ठार, तीन जखमी
कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब- देवकर
चोरल्यात डझनभर मोटारसायकली, पोलिसांनी करवली जेलची वारी

प्रदर्शन आणि अभ्यास

दरम्यान गुंजन ही ओरीयन शाळेत सातव्या वर्गात शिकत आहे. काही दिवसात तीची शाळेची परिक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ती प्रर्दशनस्थळीच परिक्षेचाही अभ्यास करत आहे. प्रदर्शन पाहण्यास आलेल्यांना ती रेखाचित्रांची माहितीही देत आहे. तर उरलेल्या वेळेत ती अभ्यास करत आहे. प्रदर्शन पाहण्यास येणारे तीच्या रेखाचित्रांचे कौतूक करत असून अभिप्राय नोंदवहीत त्यांचे अभिप्रायही नोंदवत आहेत.

कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब- देवकर
political big news # यामुळेच घोळ झाला : मुलगा मंत्री अन् स्वतःमुख्यमंत्री!
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com