श्रीक्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

श्रीक्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

एरंडोल : Erandol

तालुक्यातील श्रीक्षेत्र पद्मालय (Shrikshetra Padmalaya) गेल्या वर्षी कोरोना मुळे येथील गणपती मंदिर (Ganapati Temple)शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते मात्र यावर्षी मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी अंगारकी चतुर्थी (Angarki Chaturthi) निमित्त भाविकांनी (devotees) मोठ्या प्रमाणावर गर्दी (Crowd) केली होती जवळपास 50 ते साठ हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

पहाटे सर्वप्रथम जळगाव चे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होऊन महापूजेनंतर भाविकांसाठी दर्शनाकरिता देवालय खुले करण्यात आले सकाळी सकाळी कमी प्रमाणात भाविक उपस्थित होते मात्र दुपारपासून प्रचंड संकेत रात्री उशिरापर्यंत भाविकांची पद्मालय येथे रीघ लागली होती.

अंगारकी चतुर्थी निमित्त श्री शेत्र पद्मालय देवस्थान विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी एडवोकेट आनंदराव पाटील व डॉक्टर पिंगळे यांच्या हस्ते नितीन लढ्ढा यांचे स्वागत करण्यात आले अंगारीके निमित्त भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून विश्वस्त ए एल पाटील भाऊसाहेब कोळी, भिका महाजन व इतर विश्वस्तांनी परिश्रम घेतले. भाविकांची रांग लावण्यासाठी दर्शन बारी उभारण्यात आली तसेच अभिषेकासाठी मंडप उभारण्यात आला होता. गालापूर ग्रामपंचायत तर्फे ही व्यवस्था करण्यात आलेली होती अनेक वर्षापासून सेवा देणारे डॉक्टर पिंगळे यांनी यावेळी विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.

अंगारकी चतुर्थी निमित्त तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी उपस्थित राहून सदर भागाची पाहणी केली व पंचकमिटी पोलिस प्रशासनाच्या ओळख तर्फे माहिती जाणून घेतली एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे. यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व ७० पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला तलाठी व मंडळ अधिकारी जाधव यांची उपस्थिती होती

महामंडळाचा एसटी बसेसच्या संप असल्यामुळे इतर वाहनाने व खाजगी गाड्यांनी चारचाकी दुचाकी वाहनांनी भाविकांनी पद्मालय आला हजेरी लावली.. वाहनांना पार्किंगसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षापासून तीर्थक्षेत्रे कोरोनाच्या महामारी मुळे बंद असल्या कारणाने भाविकांमध्ये उत्साह दिसून आला रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला यावेळेस दुकाने लावलेली होती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com