दोन दिवसात 766 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

आठ महसूल मंडळात अतिवृष्टी; आत्तापर्यंत 95 टक्के पाऊस
दोन दिवसात 766 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून सूरू झालेल्या विजाच्या कडकडाटासह (crack of lightning) दमदार पावसाने (heavy rain) शेती पिकांचे (agricultural crops) मोठे नुकसान (big loss) झाले आहे. या पावसाने कापूस, केळी, मका, लिंबू बागांचेही नूकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून (Department of Agriculture) देण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने 766 हेक्टरवरील केळी, कापूस, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा तालुक्यात नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात पाठविला आहे. यात 22 गावे बाधीत असून 1 हजार 336 शेतकर्‍यांचे नूकसान झाले आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे सखल भागात पाणी साचले. अनेक शेतात पाणी साचल्याने कापूस, केळी पिकांचे सोयाबीन नुकसान झाले. दुसरीकडे पिकांना जीवदान मिळून पिकांना फुलोर लागण्याची स्थिती आगामी काळात होणार आहे.

आठ महसूल मंडळात अतिवृष्टी

काल एकूण सरासरी 25 मिलीमिटर पाउस झाला. रावेरला 60 मिलीमिटर, जळगावला 51.8 मिलीमिटर, भुसावळला 36 मिलीमिटर, चोपडा 49, मुक्ताईनगर तालुक्यात 40.3 पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यातील भोकर, धानोरा, अडावद, ऐनपूर, खिर्डी, पिंप्राळा, रावेर आणि सावदा या आठ महसूल मंडळामध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सरासरी 95 टक्के पाऊस

जळगाव जिल्ह्यात जून महिन्यापासून ते आजपर्यंत सरासरी 95 टक्के पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात जळगाव 91.50 टक्के, भुसावळ 88.50, यावल 103, रावेर 105, मुक्ताईनगर 107, अमळनेर 94.80, चोपडा 95.10, एरंडोल 94, पारोळा 79.60, चाळीसगाव 106.90, जामनेर 88.90, पाचोरा 87.30, भडगाव 101.90, धरणगाव 80.70, बोदवड 85.30 असा पाऊस झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com