संकटमोचन आमदार गिरीश महाजन यांनी शब्द केला खरा अन् पालकमंत्री पाटलांनी मानले केंद्र सरकारचे आभार

जळगावात 50 जागांच्या शासकीय होमीओपॅथी महाविद्यालयाला मान्यता ; कामाला गती देणार - पालकमंत्री
 संकटमोचन आमदार गिरीश महाजन यांनी शब्द केला खरा अन् पालकमंत्री पाटलांनी मानले केंद्र सरकारचे आभार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने (Ministry of AYUSH) जळगाव येथे 50 जागांचे होमीओपॅथी महाविद्यालय (Government Homeopathy College) मंजूर केले असून हे राज्यातील पहिले शासकीय होमीओपॅथी महाविद्यालय ठरणार आहे. यासंदर्भात माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन (Former Medical Education Minister MLA Girish Mahajan) यांनी पाठपुरावा केला होता.

जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात वैद्यकीय शाखांशी संबंधीत सर्व कॉलेजेस एकाच ठिकाणी उभारण्यासाठी मेडिकल हबला (Medical Hub) देखील परवानगी मिळाली होती. तथापी, सरकार बदलल्यामुळे मेडिकल हबच्या कामाला विराम लागलेला आहे. मध्यंतरी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार (Union Minister of State for Health no. Bharatitai Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या कल्याणम 2022 या महोत्सवात होमिओपॅथिक अभ्यासक्रमास या वर्षीच मान्यता मिळविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा केली होती.

तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडे ही त्यांनी आग्रही मागणी केली होती. या पाठपुराव्याला यश आले असून जळगाव येथे होमीओपॅथी कॉलेजला (Government Homeopathy College) मान्यता मिळालेली आहे. या संदर्भातील परिपत्रक आज जारी करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात पदवीसाठी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे याच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पायाभूत वैद्यकीय सुविधांसाठी आपण स्वत: मंत्री असतांना प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून होमीओपॅथी कॉलेज मंजूर करून आणले असून आता राज्याने आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पद निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी अपेक्षा आहे.

आ. गिरीश महाजन, माजी मंत्री

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमीओपॅथी महाविद्यालयांच्या मंजुरीच्या यादीत जळगावचा समावेश केला याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो. पुढील कामाला गती देऊ.

ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Related Stories

No stories found.