पिस्तूल, चाकूसह सराईत गुन्हेगाराला अटक

नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिस्तूल, चाकूसह सराईत गुन्हेगाराला अटक

जळगाव : jalgaon

तालुक्यातील नशीराबाद बसस्थानकावर (Nasirabad bus stand) गावठी कट्टा, जीवंत काडतुस व चाकू (Gawthi Katta, live cartridges and knives) आदी शस्त्र बाळगून फिरणार्‍या पोलिसांच्या रेकार्डवरील (Police records) सराईत गुन्हेगार (Criminal) मोहम्मद हाशीम मोहम्मद सलीम खान (Mohammad Hashim Mohammad Salim Khan) (वय ४१,रा.भुसावळ) यास स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) शुक्रवारी अटक (Arrested) केली आहे. त्याच्याविरुध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात आर्म क्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद येथे शुक्रवारी दसर्‍याच्या दिवशी दुपारी एक सराईत गुन्हेगार शस्त्रासह फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन व रवींद्र पाटील यांचे पथक रवाना केले होते. पथकाने संशयिताबाबत खात्री केली. अन् त्यानंतर बसस्थानक परिसरातुन सापळा रचून त्याला अटक केली. त्यांच्याकडे पिस्तूल, जीवंत काडतुस तर खिशात चाकू आढळून आला. गेल्या महिन्यातच भुसावळमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातही संशयित खान हा फरार होता. त्याच्याविरुध्द याआधी भुसावळच्या विविध पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर यापूर्वी हद्दपारीचीही कारवाई झाली असून हद्दपार आदेशाचेही त्याने उल्लंघन केले होते, त्यामुळे तो एक गुन्हा त्याच्याविरुध्द दाखल आहे. अशीही माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com