भाजपच्या महानगराध्यक्षांसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल

नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ रॅली, शहर पोलिसांची कारवाई
भाजपच्या महानगराध्यक्षांसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल
Crime

जळगाव - Jalgaon

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे बळीरामपेठेतील भाजप कार्यालयापासून (BJP office) महापालिकेपर्यंत रॅली काढून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले होते. जमावबंदी आदेश व विनापरवानगी रॅली काढून आंदोलन केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री ११ वाजेच सुमारास भाजप महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी (Deepak Suryavanshi), महिला जिल्हाध्यक्षा दिप्ती चिरमाडे (Dipti Chirmade) यांच्यासह २० कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (police) पोलिसांनी सरकारपक्षातर्फे फिर्यादी होवून गुुन्हे दाखल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या विरोधात बदमानीकार वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होवून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जिल्हा भाजपतर्फे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास महानगराध्यक्ष दिपक सुर्यंवशी यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश असतांना, विनापरवानगी बेकायदेशीररित्या घोषणाजी करत रॅली काढली. तसेच विविध प्रकाराच्या घोषणाबाजी करत आंदोलन केले.

याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन आंदोलनात सहभागी भाजप महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा दिप्ती चिरमाडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद सपकाळे, नगरसेविका दिपमाला काळे, नगरसेविका रंजना घोरपडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, कार्यालयीन मंत्री प्रकाश पंडीत, मंडळ अध्यक्ष विजय वानखेडे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यार्ंविरोधात मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१)(३) चे उल्लंघन व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास चर्‍हाटे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com