फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याबद्दल एरंडोल येथे युवकाविरुद्ध गुन्हा.

फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याबद्दल एरंडोल येथे युवकाविरुद्ध गुन्हा.

एरंडोल-Erandol

फेसबुक अकाऊन्टवर (Facebook account) भाजपच्या निलंबित प्रवक्त्या

(Suspended BJP spokesperson) नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना पाठींबा असल्याची पोस्ट (post) व्हायरल (Viral) केल्याबद्दल भोई गल्लीतील सव्वीस वर्षीय युवकांविरोधात (youth) पोलीस स्थानकात (police station) गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी पोलीस स्थानकाबाहेर जमून युवकाविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी केल्यामुळेल शहरात काही काल तणावाची परीस्थिती (Stressful situations) निर्माण झाली होती. संतप्त युवक विविध घोषणा दिल्यामुळे पोलिसांनी त्वरित शहरात फिरून शांतता निर्माण केली.

याबाबत माहिती अशी,की आज सायंकाळी शहरातील भोई गल्लीतील युवक मंगेश विलास भोई वय २६ या युवकाने भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्ह्यायरल केल्यामुळे अल्पसंख्याक धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून,शहरातील अल्पसंख्यांक समाजातील शेकडो युवकांनी पोलीस स्थानकात एकत्र येऊन संशायीताविरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे शहरात काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती मिळताच धरणगावचे पोलीस निरीक्षक राहुल कराड आणि पारोळ्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक बागल यांनी शहरात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले.संतप्त युवकांची समजूत काढून संशयीताविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

माजी उपनगराध्यक्ष जहिरोद्दिन कासम,जावेद मुजावर माजी नगरसेवक सलीम शेख,advt.अहमद सय्यद,आरिफ मिस्तरी,हाजी लतीफ मिस्तरी यांचेसह पदाधिका-यांनी संतप्त युवकांना शांत करून घरी जाण्याचे आवाहन केले.

संतप्त युवक घरी जात असतांना विविध घोषणा देत असल्यामुळे शहरात काही काल पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीस निरीक्षक राहुल कराड व त्यांच्या सहका-यांनी शहरात गस्त घालून शांतता राखण्याचे आवाहन केले.याबाबत असलम रशीद पिंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनेश भोई याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत.

हवालदार अनिल पाटील,पंकज पाटील,अकिल मुजावर,सुनील लोहार,जुबेर खाटिक,महेंद्र पाटील,काशिनाथ पाटील,यांचेसह गृहरक्षक दलाच्या जवानांनी शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले.दरम्यान शहरात दंगा नियंत्रक पथकाचे जवान दाखल झाले असून ठिकठीकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com