गायरान जमीन ही फक्त गायींसाठीच राखीव करण्यात यावी

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांच्या शासन दरबारी मागण्या
गायरान जमीन ही फक्त गायींसाठीच राखीव करण्यात यावी

भुसावळ bhusaval । प्रतिनिधी

गायरान जमिनीवर (Garan land) मस्जिद अथवा मंदिर नाही तर गायींसाठी ती जमीन असावी, यासाठी पुढाकार घेण्याचे काम सध्या सुरू आहे. धरणगाव (Dharangaon) येथे गायरान जमिनीवर मस्जिद बनवण्यात येत होती. प्रशासनास निवेदन देऊन न्याय मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मूक मोर्चा (silent march) काढण्यात आला. भीतीपोटी कोणी यायला तयार नव्हते. भारताचा पुत्र म्हणून मी देशसेवेसाठी समर्पित आहे. गायरानची जमीन खाली होत नसेल तर अखिल भारतीय संत समितीचे (All India Sant Samiti)180 आखाडे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

गोहत्या बंद होऊन कत्तलखाने बंद करावे व त्यासंदर्भात कायदा करावा. गायींची तस्करी करणे बंद व्हावे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या गाड्या विनाकारण अडवल्या जातात. मात्र गाय भरलेली ट्रक अडवली जात नाही. गाय हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे. मुंबई, नाशिक, पुणे विभागात कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना खूप त्रास होत आहे. मंत्री महोदय नामदार गिरीश महाजन यांनी बैठक आयोजित करून मुख्यमंत्री यांना भेटून समस्या दूर करावी असे आवाहनही जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी शासन दरबारी काही मागण्या केल्या. अनधिकृत गोवंश वाहतूक बंद करावी, गोहत्या व कत्तलखाने बंद करावे, वर्षानुवर्षे गावोगावी असलेली गायरान जमीन ही मस्जिदच काय परंतु मंदिरासाठी पण कोणाला देऊ नये. ती फक्त आणि फक्त गायींसाठीच राखीव ठेवावी, असा कायदा शासनाने करावा, ही अखिल भारतीय संत समितीची मागणी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

त्यानंतर आचार्य संदेश श्रवणजी म्हणाले की, भारतात जेवणाबरोबर परमेश्वराचे मनन केले जाते. महिलांच्या अंगावर दागिने असतात. कपाळावर कुंकू असते आणि हे मस्तक चरणावर झुकलेले असते, हिच भारतीय परंपरा सर्वश्रेष्ठ असून हीच समरसता आहे.

दिव्यानंदजी महाराज

संतांचे कार्य हे समरसतेचे असून महाभारत हे एक समरसतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी हा कुंभ आयोजित करून समरसतेचा छान सुंदर संदेश दिला आहे.

ईश्वरदासजी महाराज

भारतात सर्व मंदिरांमध्ये सर्वांना प्रवेश मिळतो. सफाई कर्मचार्‍यांनाही ध्वजाचे दर्शन करता येते. हीच आपली समरसता आहे. पृथ्वी, पाणी, सूर्य, गाय, माकड यांना आपण देव संबोधतो, ही देखील एक प्रकारे समरसताच आहे.

हरिचैतन्य महाराज

सर्वत्र आत्मसमर्पण करणे म्हणजे समरसता आहे. सर्वात आधी ऋषीमुनींनी समरसता निर्माण केली. त्यानंतर वेगवेगळे पंथ विभागले गेले. त्यामुळे आपल्यापर्यंत समरसता पोहोचली नाही. सर्व संतांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याचे अवघड कार्य जनार्दन महाराजांनी केले आहे. महानुभाव संतानी जे शब्दरूपी अमृत दिले आहे ते घेणार्‍या व्यक्तींनी अवगत केले तर समरसता निर्माण होईल.

नरसिंहदासजी महाराज

जेथे भक्ती, प्रेम, देवदर्शन, सद्गुरूंचा सहभाग असतो तिथे समरसता असते. महाकुंभात देवतुल्य महापुरूषांचे दर्शन व विचार ऐकायला मिळाले. गुरूकृपा ही आपला सन्मान आहे. जीवनाचे सार्थक करते. त्यामुळे भगवद्भक्ती होते. जनार्दन महाराजांचे आम्ही सर्व ऋणी आहोत. त्यासाठी आपण एक संकल्प करावा आणि प्रत्येक घरात अध्यात्म व प्रेमभक्ती करावी.

भक्ती किशोरदासजी महाराज

जनार्दन हरीजी महाराज हे एक मोठे नम्र व्यक्तिमत्व आहे. संतांमध्ये समरसता आहे. देवता अनेक आहे मात्र भगवंत एक आहे. मार्ग वेगळे आहे, संस्कार वेगळे आहे, परंतु सर्वांचे ध्येय एकच आहे. सध्याची पिढी ही व्यसन व मोबाईलमुळे बरबाद होत आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन की, संपत्ती बरोबरच धार्मिक संपत्तीपण पिढीला द्यावी. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी संतांच्या माध्यमातून आपल्याला जावे लागेल. मुलांना धर्म, भक्ती शिकवा. त्यांना सांभाळा, व्यसनमुक्त करा, दगड मंदिरात गेल्यावर देव होतो, संतांच्या जवळ जाऊन देव नाही बनले तर माणूस तरी बनावे.

शरणदासजी महाराज

आपल्या येणार्‍या पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आई-वडिलांनी प्रयत्न करावे. संतांनी मार्गदर्शन करावे. प्रत्येक ठिकाणी समरसतेची चर्चा व्हावी.

ज्ञानेश्वरदासजी महाराज

सृष्टीचा पहिला समरसतेचा सुंदर उपदेश देणारे श्रीकृष्ण भगवान आहे. महादेवाच्या मंदिरात नंदी, कासव, सर्प, उंदीर, मोर हे एकमेकांचे शत्रू असूनही भेदभाव विसरून भगवंताच्या चरणी लीन असतात. हिंदू समाज विखुरलेला आहे, तो एकत्र होणे गरजेचे आहे. समान नागरी कायदा होणे गरजेचे आहे. सर्वांसाठी एकच कायदा असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर हे शक्य आहे. हीच एक अशी आहे की, त्यांनी समता व समरसता संदेश भारताला देऊन विश्वगुरू बनवावे. वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यासाठी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर सुरेश सदाशिव भैयाजी जोशी, जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनीही आपले विचार व्यक्त केले.आयुर्वेदाचार्य श्री धन्वंतरी यागमध्ये जळगाव येथील श्रीकांत रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस मंडप प्रवेश, देवता स्थापन, हवन, प्रातःपूजन, हवन, अर्चन, दीपोत्सव, बलिपूजन व पूर्णाहुती आणि अखंड नामजप व नाम संकीर्तन पार पडले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com