जिल्ह्यासाठी 14 हजार 300 कोविशिल्ड लसींची उपलब्धी

जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांची माहिती; लसीकरणासाठी आवाहन
जिल्ह्यासाठी 14 हजार 300 कोविशिल्ड लसींची उपलब्धी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोना महामारीचा उद्रेक वाढल्याने अनेक तालुके कोरोना हासस्पॉट ठरले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. ग्रामीण भागात लसीकरणासाठी नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, कोविशिल्ड लसीचा पुरवठा टप्प्याटप्याने होत आहे. लसीचा डोस प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली तालुकानिहाय वितरण करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी, गोंधळ न करता कोरोनाचे नियम पाळून लसीचा डोस घ्यावा.

रंजना पाटील, अध्यक्षा, जि.प.जळगाव

जिल्ह्यात कोविडच्या लसीकरणाबाबत 12 मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडून आढावा घेतला असून जिल्ह्यासाठी 14 हजार 300 कोविशिल्ड लसीचा डोस प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असतानाच नागरिकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 327 नागरिकांना करोना लसीचा पहिला डोस तर 96 हजार 616 नागरिकांना दुसरा डोस असे एकूण 4 लाख 13 हजार 943 लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आता 12 मे रोजी 14 हजार 300 कोविशिल्ड लसीचा डोस प्राप्त झाला असून जिल्ह्यात तालुकानिहाय लसीचा डोस वाटप करण्यात आला आहे.

तालुका निहाय लसीचे वाटप

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्यात उपग्रामीण रुग्णालयासह 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यात

अमळनेर-1000,

भडगाव-600,

भुसावळ न.पा.-950,

भुसावळ तालुका वैद्यकीय विभाग-850,

बोदवड- 400,

चाळीसगाव-1450,

चोपडा- 1000,

धरणगाव-600,

एरंडोल-500,

जळगाव सिव्हील- 1250,

जळगाव-500,

जामनेर-1000,

मुक्ताईनगर- 550,

पाचोरा- 950,

पाचोरा ग्रामीण-550,

रावेर-1100,

यावल-1050

असे एकूण 14 हजार 300 कोविशिल्ड लसीच्या डोसचे वाटप करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com