जवखेडे सिम शिवारात 80 हजार रुपये किमतीच्या कापसाची चोरी

कापूस
कापूस

कासोदा, Kasoda ता.एरंडोल (विशेष प्रतिनिधी)

येथून जवळ असलेल्या जवखेडे सिम (Jawkhede Sim Shivarat) ता. एरंडोल शिवारात 31 ऑक्टोबरच्या रात्री शंकर अर्जुन सोनवणे यांच्या शेतात (field) पत्र्याच्या शेडमध्ये (sheet shed) असलेला 80 हजार रुपये किमतीचा कापूस चोरीस (Cotton theft) गेला असून, त्या संदर्भात कासोदा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

सदर घटनेबाबत शंकर अर्जुन सोनवणे यांनी कासोदा पोलीस स्टेशनला नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जवखेडे शिवारातील गट नंबर ३०३/३०४ मध्ये शेतमाल ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड केलेले आहे .त्यात शेतातील सुमारे वीस क्विंटल कापूस ठेवलेला होता. ते रात्री दहा वाजता शेतात झोपण्यासाठी गेले. तिथे झोपले असता रात्री थंडीचे प्रमाण वाढले .त्यांच्याकडे उबदार कपडे नसल्यामुळे रात्री 1 :30 वाजता घरी आले .घरी येण्याआधी त्यांनी पत्र्याच्या शेडचे व गेटचे कुलूप व्यवस्थित लावून घरी आले

सकाळी मुलगा दूध काढण्यासाठी शेतात गेला असता, त्याला शेडचे कुलूप तुटलेले दिसले. बाहेर कापूस पडलेला दिसला. त्याने वडिलांना फोनवर सर्व घटना सांगितली. अज्ञात चोरट्यांनी चार चाकी वाहनाने सदर माल चोरून नेला.त्यात दहा ते बारा क्विंटल कापूस ज्याचे अंदाजे किंमत रुपये 80 हजार होते तो चोरीस गेला .

त्याबाबत कासोदा पोलीस स्टेशनला शंकर अर्जुन सोनवणे यांनी तक्रार दिली असून, भारतीय दंड संहिता 380 ,461 नुसार गुन्हा नोंदविला असून एपीआय निता कायटे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल कैलास खंडू हडप पुढील तपास करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com