पांढऱ्या सोन्याल्या मिळाला 11 हजार रुपयांचा विक्रमी भाव

ना.गुलाबराव पाटलांच्या हस्ते काटापूजन करून खरेदीस प्रारंभ
पांढऱ्या सोन्याल्या मिळाला 11 हजार रुपयांचा विक्रमी भाव

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

कापूस (Cotton) नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या धरणगावात श्री गणेश चतुर्थीच्या (Shri Ganesh Chaturthi) मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ झाला. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांच्या हस्ते काटा पूजन करून विधीवत कापूस खरेदी सुरू झाली. मुहुर्तालाच कापसाला तब्बल 11 हजार 153 रूपये प्रति क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला.

धरणगावातील (dharangaon) जिनींग व्यवसाय हा जिल्ह्यात सर्वात मोठा असून येथील भाव हा परिसरात प्रमाण मानला जातो. परंपरेनुसार प्रत्येक गणेश चतुर्थीला काटा - पूजन करून कापूस खरेदी सुरू होत असते. या अनुषंगाने आज श्रीजी जिनींग येथे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ, श्रीजी जिनींगचे संचालक नयनशेठ गुजराथी, जीवनसिंग बयस, सागर प्रकाश करवा व माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, पी.एम.पाटील, राजेंद्र महाजन , पप्पू भावे, निलेश चौधरी, भरत चौधरी, विलास महाजन, भैय्या महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

तिन्ही गुलाब एकाच ठिकाणी

आज झालेल्या कार्यक्रमाला ना.गुलाबराव पाटील यांच्यासह या कार्यक्रमाला त्यांचे राजकीय विरोधक असलेले गुलाबराव देवकर आणि गुलाबराव वाघ हे देखील उपस्थित होते. यामुळे एकाच ठिकाणी तिन्ही गुलाब एकत्र आल्याची चर्चा रंगली. श्रीजी जिनींगचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी हे आता विरोधी गटात (ठाकरेगटात) असतांनाही ना.गुलाबराव पाटील यांनी काटा पूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com