वरणगाव फॅक्टरी कॅन्टीनमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार

सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांचा आरोप : केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार
वरणगाव फॅक्टरी कॅन्टीनमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार

वरणगाव Varangaon । वार्ताहर

ऑर्डनन्स फॅक्टरीत Ordnance Factory काम करणारे कर्मचारी व पेन्शनर कर्मचार्‍यांसाठी कॅन्टीनमध्ये Canteen गृहपयोगी वस्तूंची विक्री केली जाते. वस्तूंची खरेदी कर्मचारी व्यतिरिक्त बाहेरील कुठलाही व्यक्ती खरेदी करू शकत नाही. पण कॅन्टीनचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी Officers and staff लाखो रुपयांचा माल Goods जिल्ह्यात सप्लाय केल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना Social activist Sanjay Khanna यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, वरणगांव ऑर्डन्स फॅक्टरी कॅन्टीनमधील कर्मचारी व पेन्शनरसाठी आलेला माल चारचाकी वाहन क्र. एम. एच. 19 सी. वाय.2321 यामध्ये भरून विक्री करीत देशासोबत गद्दारी करीत आहेत.

रिक्षा चालक फिरोज खान मुक्ताईनगर येथुन रिक्षा घेऊन येत असतांना वरणगांव ऑडन्स फॅकटरी जवळ रस्त्यामध्ये एक व्यक्तीने रिक्षा थांबविली व ऑडन्स फॅक्टरीमधून काही सामान घेऊन जायचा आहे असे सांगून वरणगांव ऑडन्स फॅक्टरी कॅन्टीनमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी सपकाळे नामक अधिकारी यांनी रिक्षा भरून दिली. रिक्षा भरून भुसावळ येथील नाहाटा चौफुलीवर गेली व त्या ठिकाणी दुसर्‍या रिक्षेत माल टाकून 500 रुपये भाडे घेऊन निघून गेला अशी माहिती खन्ना यांना मिळाली.

येथील कॅन्टीन अधिकारी व कर्मचारी संगमनत करून प्रशासनाची फसवणूक करीत आहे. निर्माणीतील कर्मचार्‍यांना आपल्या परिवारासाठी लागणार्‍या गृहपयोगी वस्तू कॅन्टीनमध्ये संपल्याचे भासवून सदर माल बाहेर जादा दराने विक्री करीत असल्याने ऑडनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांना माल न घेता घरी परतावे लागत आहे. सदर कॅन्टीनमधून ज्या वस्तू बाहेर सप्लाय करण्यात येत आहे त्या कोणाच्या कार्डावर दाखविण्यात येत आहे? ऑडिटमध्ये सप्लाय केलेला माल कसा दाखविला जातोे? यात कोणत्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा सहभाग आहे? असा प्रश्न उपस्थित करून या सुरू असलेला भ्रष्ट्राचाराची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com