जिल्ह्यात कोरोनाचा सुपरस्प्रेड

दिवसभरात आढळले तब्बल 221 नवे रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाचा सुपरस्प्रेड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाच्या (corona) तिसर्‍या लाटेत (third wave) नव्याने आढळून येणार्‍या रुग्णाच्या संख्येत (number of patients) दिवसेंदिवस कमालची वाढ (Increase)होत आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोनाने शंभरी पार केली होती. आज जिल्ह्यात कोरोनाने दोनशेचा आकडा पार करुन जळगाव जिल्हावासियांची चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने तब्बल 221 नवे रुग्ण (New patients) आढळून आले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी जळगाव शहर 43, जळगाव ग्रामीण 4, भुसावळ 107 , चोपडा 32, पाचोरा 5, एरंडोल 5 , पारोळा 2, चाळीसगाव 14, मुक्ताईनगर 1, बोदवड 1 व ईतर जिल्हयातील 7 असे एकूण 221 नवे बाधित आढळून आले. अमळनेर, भडगाव, धरणगाव, यावल, जामनेर व रावेर या तालुक्यांमध्ये एकही नवा बाधित आढळून आलेला नाही. तसेच जिल्ह्यात आज 6 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 1 लाख 40 हजार 261 एवढ्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 2 हजार 579 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत 767 ऍक्टीव रुग्ण आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली

आठवडाभरात दोनशेचा आकडा पार

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या सुपरस्प्रेडला सुरुवात झाली आहे. दहाच्या आत असलेल्या कोरोनाने दोन दिवसांपूर्वी शंभरी ओलांडली. 179 रुग्ण आढळून आले आहेत. आठवडाभरातच कोरोनाने दोनशेचा आकडा पार केला असून कोरोनाच्या रुग्णांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com