जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

दिवसभरात कोरोनाचे 179 नव्या रुग्णांची नोंद; अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 473 वर
जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची (Coronary obstruction) संख्या मंदावली होती. मात्र आठवडाभरापासून जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दिवसभरात कोरोनाच्या 179 नव्या रुग्णंची (new patients) नोंद झाली असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट (Corona explosion) झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. तिसर्‍या लाटेत कोरोनाचे रौद्ररुप पाहावयास मिळत आहे. आठवड्याभरात जिल्हयात कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल 179 नवे बाधित रुग्ण आढळून आले आल्याने जिल्हा प्रशासनाची नाची चिंता चांगलीच वाढलेली आहे. रविवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात 64, जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 75, अमळनेर 1, चोपडा 2, पाचोरा 2, धरणगाव 1, जामनेर 5, रावेर 2, चाळीसगाव 16, मुक्ताईनगर 2, बोदवड 5 व इतर जिल्ह्यातील एक असे एकूण 179 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ही 1 लाख 43 हजार 306 इतकी झाली असून 1 लाख 40 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 2 हजार 579 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असल्याची असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण (District Surgeon Dr. Nagarao Chavan) यांनी दिली.

अ‍ॅक्टीव्ह रुग्ण पाचशेच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी असल्याने कोरोनाचा भिती कमी झाली होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. दरम्यान, रविवारी नवीन 179 रुग्णांची भर पडल्याने आता जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 473 वर पोहचली आहे. तसेच जळगाव व भुसावळात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने हे दोन तालुके हॉटस्पॉट ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com