
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना (Corona) बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून शनिवारी जिल्ह्यात 377 नवे बाधित रुग्ण (Infected patients) आढळून आले आहे. आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा बँकेचे (District Bank) चेअरमन (Chairman ) माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांचा सामवेश आहे.
जिल्ह्यात शनिवारी जळगाव शहर 155, जळगाव ग्रामीण 9, भुसावळ 144, अमळनेर 13, चोपडा 15, पाचोरा 1, भडगाव 4, धरणगाव 1, यावल 2, एरंडोल 3, जामनेर 2, रावेर 3, पारोळा 1, चाळीसगाव 20 व अन्य जिल्ह्यातील 1 असे एकूण 377 नवे बाधित आढळून आले. मुक्ताईनगर, बोदवड या दोन तालुक्यांमध्ये एकही नवा बाधित आढळून आलेला नाही. तसेच जिल्ह्यात आज 46 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 1 लाख 44 हजार 805 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1 लाख 40 हजार 379 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 2 हजार 580 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत 1 हजार 846 ऍक्टीव रुग्ण आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर पॉझिटिव्ह
जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना कोरनाची बाधा झाल्याचे शनिवार, 15 जानेवारी रोजी स्पष्ट झाले. अचानक त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची गुरुवारी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून, देवकर हे कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. लक्षणे सौम्य असल्याने त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
डॉक्टर घरीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. गेल्या दोन दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन गुलाबराव देवकर यांनी केले आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.