जेवणाच्या डब्यातून कॉपर प्लेट चोरणारा जाळ्यात

जेवणाच्या डब्यातून कॉपर प्लेट चोरणारा जाळ्यात
USER

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील (Deepanagar Thermal Power Station) 500 मेगावॅट प्रकल्पातून कॉपर प्लेट (Copper plate) जेवणाच्या डब्यात (lunch box) लपवून चोरी (thief) करताना एक रोजंदारी कामगार (Salaried workers) सरप्राईज तपासणीत आढळून आला. या रोजंदारी कर्मचार्‍याला कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आल्याची माहिती सुरक्षा विभागाचे वरीष्ठ व्यवस्थापक आर.डी. पाटील (Senior Security Manager R.D. Patil) यांनी दिली.

दीपनगरातील 500 मेगावॅट प्रकल्पात सोमवार, दि.20 रोजी कामाची शिफ्ट सुटल्यानंतर सुरक्षा विभागाने अचानकपणे तपासणी मोहिम राबवली. या मोहिमेत साकरी येथील रहिवाशी ठेकेदाराकडील रोजंदारी कामगार अनिल वारके याच्या जेवणाच्या डब्यात सुमारे एक फुट लांब कॉपरची आर्थिंग प्लेट वेटोळे केलेल्या स्थितीत आढळून आली. या प्रकरणी सुरक्षा विभागाने संबंधीत ठेकेदाराला बोलावून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. सुमारे 400 रुपये किंमतीची ही प्लेट असल्याने पोलिसात गुन्हा दाखल न करता या कामगाराला शिक्षा म्हणून त्याला कामावरुन तातडीने काढण्यात आले.

या घटनेमुळे दीपनगरात खळबळ उडाली. सरप्राईज तपासणी झाली म्हणून हा प्रकार समोर आला. दररोज तपासणी झाल्यास असे अनेक प्रकार समोर येतील, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या कर्मचार्‍याला तातडीने कामावरुन कमी केले आहे. सरप्राईज तपासणी कसून केली जाईल, असे सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आर. डी. पाटील यांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंतही तालुका पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता.

बीकानेर एक्सप्रेसमधून मोबाईल चोरीप्रकरणी महिला गजाआड -

गाडी क्रमांक 22737 अप बिकानेर एक्सप्रेस मधून भुसावळ स्थानकावर 20 हजार किंमतीचा मोबाईल चोरीप्रकरणी 16 डिसेंबरला रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिला बबली चव्हाण यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन महिलेकडून 20 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नरेंद्र पुसालालजी सेन (वय 53, रा.पार्श्वनाथ नगर 2, बालहंस स्कुल जवळ, परीहार नगरच्या मागे भदवासिया, जोधपुर राजस्थान) हे दि. 16 रोजी गाडी क्रमांक 22737 अप बिकानेर एक्सप्रेसचे कोच नं. एस -10 बर्थ नं. 24 वरून प्रवासात असतांना गाडी भुसावळ रेल्वे स्टेशनवर उभी असतांना 25 वर्षीय महिलेने बर्थवर ठेवलेला मोबाईल नजर चुकवून चोरून नेल्याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास पोलीस अधिक्षक लोहमार्ग औरंगाबाद मोक्षदा पाटील, उपविपोअधि लोहमार्ग मनमाड दीपक काजवे, रेल्वे पोनि विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकृष्ण मिना भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. अजीत तडवी, जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवानसिंग राजपुत, महिला पो.हवा. गायत्री पोरटे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे सहा.फौज. प्रेम चौधरी, वसंत महाजन यांनी फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून सीसीटीव्ही फुटेज वर महिला बबली करण चव्हाण (बंजारा, वय 25, रा. घर नं. 40/1, मॉडेल ग्राउंड, बड बाग शहानहाबाद, भोपाल म.प्र. (फिरस्ती) या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून 20 हजार किंमतीचा मोबाईल हस्तगत करून जप्त करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पो.हवा. श्रीकृष्ण निकम करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com