आपले विद्यापीठ महाराष्ट्रात आदर्श विद्यापीठ म्हणून नावारूपास येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य - ना.गुलाबराव पाटील

आपले विद्यापीठ महाराष्ट्रात आदर्श विद्यापीठ म्हणून नावारूपास येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य - ना.गुलाबराव पाटील

जळगाव - jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (North Maharashtra University) सर्व चांगल्या गोष्टींसाठी तसेच शैक्षणिक दृष्ट्या आघाडी वर असून महाराष्ट्रात (maharastra) असलेल्या सर्व विद्यापीठात आपले विद्यापीठ सर्व बाबतीत आदर्श विद्यापीठ म्हणून ओळखले जावे म्हणून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटीबध्द असून अलीकडेच विद्यापीठाच्या नवीन नवीन अतिशय चांगल्या योजनांसाठी भरीव निधी मिळवून देण्यात आला असून आणखी काही आदर्श आणि विकासात्मक कामांसाठी भविष्यात सुध्दा निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही ना.गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिली.

विद्यापीठाचे नूतन कुलसचिव म्हणून नुकतेच रुजू झालेले डॉ. विनोद प्रभाकर पाटील (Dr. Vinod Prabhakar Patil) यांनी आज ना.गुलाब राव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली असता ते बोलत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नुकतीच डॉ.विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी बुधवार दि.७ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

ना.गुलाबराव पाटील यांनी आपण आजवर विद्यापीठाच्या विविध कामांना गती देण्याचा प्रयत्न केला असून भविष्यात देखील या प्रकारचे सहकार्य कायम राहणार असल्याची ग्वाही दिली.

आपल्या विद्यापीठातील दर्जेदार शिक्षणाची ख्याती ही देश-विदेशात पोहचवावी आणि हा लौकीक वाढविण्यासाठी आपल्याला हवे असणारे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

तर, नूतन कुसाचिव डॉ.विनोद पाटील यांनी आपण विद्यापीठाचा लौकीक वाढविण्यासाठी नेहमीच कटिबध्द राहू अशी ग्वाही देत ना.गुलाब रावजी पाटील यांच्या कडून विद्यापीठाला आजवर जे सहकार्य मिळाले आहे तसेच भविष्यातही सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपअभियांता राजेश इच्छाराम पाटील, सुरेश डी.चव्हाण, सोपान भाऊ पाटील, नारायण आप्पा सोनवणे, राजेंद्र चव्हाण, नवलसिंग पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com