सिलेंडरच्या स्फोटात स्वयंपाकी ठार

एक गंभीर जखमी; जळगावच्या तुकारामवाडीतील दुर्घटना
सिलेंडरच्या स्फोटात स्वयंपाकी ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ऑर्डरसाठी गुलाबजाम तयार करतांना अचानक सिलेंडरची नळी (Cylinder tube) निघाल्यामुळे सिलेंडरचा स्फोट (blast) झाल्याची घटना तुकाराम वाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत स्वयंपाक तयार करीत असलेले केटर्स बन्सीलाल सुवालाल पांडे (Bansilal Suvalal Pandey) (वय-60) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर त्यांच्या मदतीला असलेला कारागिर बालकिशन गणेशलाल जोशी हे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात घटनेची व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडा जिल्ह्यातील आसिन तालुक्यातील कावलास गावातील बन्सीलाल सुवालाल पांडे हे पत्नीसह गेल्या चाळीस वर्षांपासून शहरातील तुकाराम वाडी परिसरात वास्तव्यास आहेत. याठिकाणी त्यांचे बन्सीलाल पांडे केटर्स (Bansilal Pandey Caters) नावाने केटरींगचा व्यवसाय आहे. मंगळवारी त्यांना स्वयंपाकाची ऑर्डर (Cooking order) असल्याने ते आपल्या घराच्या कंपाऊंटमध्ये करागिर गणेशलाल बालकिशन जोशी यांच्यासोबत गुलाबजाम तयार करीत होते. स्वयंपाक करीत असतांना गॅस सिलेंडरला लावलेली नळी निघाल्याने सिलेंडरने (cylinder) पेट घेतला.

यावेळी गॅसचा भडका (Gas explosion) इतक्या जोरात होता की, त्यामुळे गुलाबजाम बनविणारे बन्सी महाराजा हे त्यांच्या मागे असलेल्या भिंतीवर आढळल्या गेले. यात त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर त्यांच्यासोबत काम करणारा कारागिर बालकिशन गणेशलाल जोशी यांना देखील दुखापत झाल्याने ते गंभीर जखमी (Injured) झाले. दरम्यान त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तर जखमी बालकिशन यांच्यावर खासगी रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहे.

दोन बंबांनी आली आग आटोक्यात

या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन पथकाच्या (Fire brigade) दोन बंबांसह कर्मचारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजित घरडे, वाहन चालक नासिर अली शौकात अली, भिला कोळी, सोपान जाधव, नितीन बारी, तेजस जोशी, युसुफ पटेल, निवांत इंगळे, संतोष पाटील, मोहन भाकरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हे आग आटोक्यात आणली.

बन्सी महाराजांची पत्नी सरपंच

बन्सी महाराज पांडे यांना केटरींगच्या व्यवसायात (business of catering) त्यांची पत्नी मदत करते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी त्या आपल्या गावी गेल्या असल्यामुळे त्यांना मदतीसाठी बालकिशन हे आले होते. तसेच त्यांची पत्नी हे राजस्थानमधील कावलास येथील सरपंच देखील असून घटनेबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस (police) ठाण्याचे उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोना कुदस्सर काझी, किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

रस्त्यावर रक्ताचा सडा

गॅस सिलेंडरचा स्फोट (Explosion) इतका जोरात होता की, त्याचा आवाज नेरी नाक्यापर्यंत ऐकू आला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, बन्सी महाराज हे गेल्याचाळीस वर्षांपासून याठिकाणी केटर्सचा काम करीत आहे. दरम्यान, स्फोटामुळे त्यांच्या डोक्याचा एक भाग पुर्णपणे चुराडा झाल्याने त्यांच्या घराशेजारी असलेल्या रस्त्यावर रक्ताचा सडा पडला असल्याचे दिसून आले.

महापौरांची घटनास्थळी भेट

सिलेंडरचा स्फोट झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच याठिकाणी त्यांनी उपस्थितांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान, यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

...तर घटनेची पुनर्रावृत्त

बन्सी महाराज यांचा केटर्सचा व्यवसाय असल्याने त्यांच्या घरात स्वयंपाक करीत असलेल्याठिकाणी सुमारे 8 ते 10 गॅस सिलेंडर होते. परंतु गॅसचा स्फोट झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत हे सिलेंडर घराबाहेर फेकले. अन्यथा गेल्या काही वर्षांपुर्वी याच परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होवून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. याच घटनेची पुनर्वावृत्ती आज झाली असती.

अनवाणी पाय घेवून वाचविले प्राण

गल्लीतील प्रत्येक नागरिक मिळेल त्या वस्तुने आगीवर पाण्याचा मारा करीत होता.याचवेळी अनवाणी आलेल्या दीपक कोल्हे यांनी आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी बन्सीलाल महाराज हे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते तर त्यांच्याशेजारी कारागिर बालकिशन हे मदतीसाठी याचना करीत होते. दरम्यान, कोल्हे आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आगीत उडी घेवून जखमी बालकिशन यांना आगीतून बाहेर काढीत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेत कोल्हे यांच्या हात व पाय भाजले गेल्याने ते देखील जखमी झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com