Photos #आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचे योगदान: ना. भारती पवार

जिल्ह्यातील ३५ होमिओपॅथिक डॉक्टरांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित 
Photos #आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचे योगदान: ना. भारती पवार

जळगाव jalgaon

कोरोना काळात (Corona period) सर्वच डॉक्टरांनी एकजुटीने काम (Doctors work together) केले आहे. भविष्यातील आरोग्यसेवा (Healthcare) मजबूत करण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचे (homeopathic doctors) अतिशय महत्त्वाचे योगदान (Contribution) असून त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी केंद्रातून प्रयत्न करेल, असे आश्वासन केंद्रिय राज्यमंत्री भारतीताई पवार (Union Minister of State Bharatitai Pawar) यांनी दिले

जागतिक होमिओपॅथिक दिना (World Homeopathy Day) निमित्ताने संभाजी राजे नाट्यगृहांमध्ये खान्देशी एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून केंद्रीय मंत्री भारतीताई पवार (Union Minister of State Bharatitai Pawar) लाभल्या होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil), माजी मंत्री आ.गिरीश महाजन, ,खासदार उमेश पाटील ,आमदार चंदूलाल पटेल, होमिओपॅथीचे डॉ प्रकाश भंगाळे , डॉ सुभाष देशमुख ,डॉ रितेश पाटील ,खामगाव येथील दादासाहेब कवीश्वर डॉ.संजय कुमार तिवारी, अकोला चामुंडा माता कॉलेजचे संस्थापक पी ई तात्या पाटील आदी उपस्थित होते.

कोविड काळामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांनी केलेल्या कामाचं कौतुक केंद्रीयमंत्री भारतीताई पवार यांनी केले. आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी महाराष्ट्रातील पहिलं होमिओपॅथिक कॉलेज (Homoeopathic College) जळगावात सुरू करण्यासाठी मी मंत्री असताना प्रयत्न सुरू केले होते. जळगावात महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज सुरु होणे हे माझं स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल आणि होमिओपॅथिक कॉलेज लवकरात लवकर जळगावला सुरू करेल त्याकरता केंद्राची मदतही घेईल, असे आश्वासन यावेळी आ.महाजन यांनी दिले.

यावेळी डॉक्टर दादासाहेब कविईश्वर यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या असलेल्या होमिओपॅथिक कॉलेज अकोला यांचाही गुणगौरव करण्यात आला. यावेळी कोविड काळामध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवेत वाहून घेतलेल्या डॉ प्रफुल्ल विजयकर , डॉ मिलिंद राव या डॉक्टरांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्या या गौरवशाली सेवेबद्दल त्यांच्या कुटुंबियांना जीवन गौरव पुरस्कार ( Lifetime Achievement Award) देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्यातील ३५ होमिओपॅथिक डॉक्टरांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . सूत्रसंचालन डॉ.रितेश पाटील यांनी केले. आभार डॉ. दीपक पाटील यांनी मानले.

Related Stories

No stories found.